Sindhudurg Leopard Sighting| घराच्या अंगणात बिबट्याचा मुक्तसंचार

सांगुळवाडी-मगावाडीत भीतीचे वातावरण
Leopard Sighting
घराच्या अंगणात बिबट्याचा मुक्तसंचार
Published on: 
Updated on: 

वैभववाडी : सांगुळवाडी-मगावाडी येथे शुक्रवारी पहाटे बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगुळवाडीच्या माजी सरपंच राधिका शेळके यांच्या घराच्या अंगणात बिबट्या फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेे. बिबट्या थेट मानवी वस्तीतील घराच्या अंगणात आल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

शुक्रवारी पहाटे बिबट्या शेळके यांच्या घराच्या अंगणात फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आले. सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याच्या हालचाली असल्याची चर्चा असतानाच आता तो थेट लोकवस्तीतील घरांच्या अंगणापर्यंत पोहोचल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

घटनेची माहिती मिळताच वनपाल सुरेश पटकारे, वनरक्षक घुगे, वैशाली कांबळे तसेच रेस्क्यू टीम शुक्रवारी सायंकाळी गावात दाखल झाली. वनविभागाच्या पथकाने परिसराची पाहणी सुरू केली असून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे लावण्यात येणार आहेत. बिबट्याचा ठावठिकाणा शोधून त्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यात येणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.