सिंधुदुर्ग : कुडाळातील महिलेवर बेळगावात अनैतिक कृत्य

संशयित फरार; पोलिस मागावर
Sexual assault case
कुडाळातील महिलेवर बेळगावात अनैतिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला. Pudhari File Photo
Published on
Updated on

कुडाळ : पतीची दारू सोडवून देतो, असे आमिष दाखवून कुडाळ तालुक्यातील एका महिलेला बेळगाव येथे नेऊन तिच्याशी अनैतिक कृत्य केले. ओरडली तर जिवंत जाळून टाकीन व हा प्रकार कोणाला सांगितला, तर व्हिडीओ बनवून सर्वांना पाठवीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी चंद्रकांत सखाराम मराठे (रा. घावनाळे-बामनादेवी, ता. कुडाळ) याच्यावर कुडाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 23 व 24 जुलै रोजी घडली. संशयिताचा पोलिस शोध घेत असून तो फरार असल्याची माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.

कुडाळ तालुक्यातील एका महिलेला 23 जुलै रोजी पतीची दारू सोडवून देतो, यासाठी आवश्यक त्या औषधासाठी प्रथम आंबोली येथे जाऊया. आंबोली येथे गेल्यावर बेळगाव येथे ते औषध आहे. तिथे आपण जाऊया, असे संशयिताने या महिलेला सांगितले. यानंतर तिथे आपल्या चारचाकी वाहनातून मित्राच्या घरी नेले. त्यानंतर त्या महिला रात्री झोपेत असताना संशयिताने तिचे तोंड दाबून तिच्या मनाविरुद्ध अनैतिक कृत्य केले. यावेळी तू ओरडशील तर तुला जिवंत जाळून मारून टाकीन, अशी धमकी देऊन त्याचा व्हिडिओ बनवून कोणाला सांगितले तर व्हिडिओ सर्वांना पाठविण्याची धमकी दिली. याप्रकरणी या महिलेने प्रथम वेंगुर्ले पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याप्रकरणी संशयित आरोपी चंद्रकांत सखाराम मराठे (रा.घावनाळे बामनादेवी, ता. कुडाळ) याच्यावर वेंगुर्ले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिला ही कुडाळ तालुक्यातील असल्याने याबाबतच्या तपासासाठी हा गुन्हा कुडाळ पोलिस ठाण्यात झिरो नंबरने वर्ग करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. वाघाटे करत आहेत.संशंयिताचा शोध घेवूनही तो सापडला नसून तो फरार असल्याची माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news