Sindhudurg Omkar Elephant| ओंकार हत्तीची कुडाळ तालुक्यात एन्ट्री

काही वर्षांपूर्वीच्या आठवणी झाल्या ताज्या; परिसरात भीती
Omkar Elephant
Omkar ElephantPudhari
Published on: 
Updated on: 

कुडाळ : सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात वास्तव असलेला ओंकार हत्ती सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्याच्या सीमेवर सावंतवाडी तालुक्याच्या हद्दीत वावरत आहे. सोमवारी दुपारी आकेरी येथे त्याने कुडाळ तालुक्याच्या हद्दीत काही काळ प्रवेश केला. त्यानंतर परत तो मळगाव परिसरात सावंतवाडी तालुक्याच्या हद्दीत परतला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाकडून सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. कुडाळ तालुक्याच्या सीमेवर हत्ती दाखल झाल्याने, काही वर्षांपूर्वी कुडाळ तालुक्यातील हत्तींच्या उपद्रवाच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत.

मागील काही महिन्यांपासून दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात ओंकार नावाच्या हत्तीचा वावर सुरू आहे. कधी शेतात तर की लोकवस्तीत तर कधी रस्त्यावर या हत्तीचे नागरिकांना दर्शन होत आहे. मात्र, ओंकार सोमवारी कुडाळ तालुक्याच्या हद्दीवर थेट येऊन पोहोचला. दुपारी तो कुडाळ तालुक्याच्या आकेरी भागात दाखल झाला. जवळपास तासभर तो कुडाळ हद्दीत होता. यावेळी काही वेळ त्याने विश्रांतीही घेतली. त्यानंतर परत तो मळगाव भागात माघारी परतला, वन विभागाकडूनही याला दुजोरा देण्यात आला. दरम्यान, वन विभागाची टीम घटनास्थळी तैनात होती.

ओंकार हत्ती कुडाळ तालुक्याच्या सीमेवर दाखल झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही वर्षांपूर्वीच्या हत्तींच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. माणगाव खोऱ्यासह कुडाळ तालुक्याच्या सह्याद्रीपट्ट्यात रानटी हत्तींचा मोठा वावर होता. हत्तींच्या उपद्रवामुळे या भागातील शेतकरी, नागरिक हैराण झाले होते. हत्ती हटाव मोहीम महत्त्वपूर्ण ठरली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.