Sindhudurg Accident : पावशीत डंपरची धडक बसून पादचारी गंभीर

ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
Accident
AccidentPudhari
Published on
Updated on

कुडाळ : मुंबई - गोवा महामार्गावरील पावशी कुंभारवाडी येथे भरधाव डंपर समोर अचानक एक पादचारी नागरिक आडवा आल्याने, त्याला डंपरची धडक बसली. यात तो महामार्गावर कोसळून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात शनिवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास झाला. घटनास्थळी नागरिक व वाहनधारकांची मोठी गर्दी झाली होती.

डंपर पणदूरहून कुडाळच्या दिशेने जात होता. त्याचवेळेस दुसऱ्या बाजूच्या लेनवरून दुभाजक ओलांडून, गोव्याकडे जाणाऱ्या लेनवर महामार्ग ओलांडण्यासाठी एक अनोळखी तरूण अचानक डंपर समोर आला व डंपरला आदळून महामार्गावर कोसळला. यात त्याच्या डोक्याला मागील बाजूला गंभीर दुखापत होऊन तो बेशुद्ध झाला. लागलीच वाहनधारक व नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून त्याला ओरोस येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुडाळ पोलिसांना माहीती देण्यात आली. त्यानंतर त्या अनोळखी जखमी तरुणाची ओळख पटविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news