Sindhudurg News : कुडाळ महाविद्यालयातील चार एनसीसी कॅडेटस्‌ची राष्ट्रीय स्तरावर निवड!

५८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी., सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर समूहाच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय यश
Sindhudurg News
कुडाळ महाविद्यालयातील चार एनसीसी कॅडेटस्‌ची राष्ट्रीय स्तरावर निवड!
Published on
Updated on

कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एन.सी.सी.) विभागाने पुन्हा उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ५८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी., सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर समूह यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित निवड प्रक्रियेत महाविद्यालयातील चार एन.सी.सी. कॅडेट्सची अखिल भारतीय थल सैनिक शिबिर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

एस.यू.ओ. अनंत शृंगारे यांची अंतरमापन व मैदानी संकेत या प्रकारातून तसेच, कॅडेट. गंगाराम पांडुरंग भाईप, कॅडेट. समीक्षा पवार आणि एस.जी.टी. हर्षदा साळगावकर या तीन कॅडेट्सची अडथळा प्रशिक्षण या प्रकारातून निवड होऊन त्यांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. चारही कॅडेट्सनी कठोर प्रशिक्षण, शारीरिक क्षमता, सातत्यपूर्ण सराव, शिस्त, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या बळावर ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विविध स्तरांवरील निवड प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करत त्यांनी अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धेत स्थान मिळवले आहे.

महाराष्ट्रातील एकाच महाविद्यालयातील चार एन.सी.सी. कॅडेट्सची एकाचवेळी या उच्चस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणे ही उल्लेखनीय आणि अभिमानास्पद कामगिरी मानली जात आहे. या यशामुळे संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागाची कामगिरी अधोरेखित झाली असून महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांसाठीही हे यश प्रेरणादायी ठरले आहे.     या यशामागे क. म. शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे माजी ए.एन.ओ कॅप्टन आवटे तसेच विद्यमान सी.टी.ओ डॉ. योगेश कोळी यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, ५८ महाराष्ट्र बटालियन एन. सी.सी., सिंधुदुर्गचे कमांडिंग ऑफिसर, असोसिएट ऑफिसर, बटालियनमधील सर्व पीआय स्टाफ आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचेही सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news