माणगाव येथील कृष्णा आडेलकर यांचा प्रामाणिकपणा: सापडलेला मोबाईल केला परत

Sindhudurg News | रामकृष्ण धुरी यांच्याकडे मोबाईल सुपूर्द
lost mobile returned
वेंगुर्ले : गहाळ मोबाईल मूळ मालकास सुपूर्द करताना महिला पोलीस दिपा मठकर.Pudhari Photo
Published on
Updated on

वेंगुर्ले; पुढारी वृत्तसेवा : कुडाळ तालुक्यातील माणगाव मळावाडी येथील रहिवासी कृष्णा प्रकाश आडेलकर यांना सावंतवाडी ते वेंगुर्ले प्रवासादरम्यान मळगाव येथे सकाळी सुमारे १५ हजारांचा मोबाईल सापडला होता. त्यांनी तो मोबाईल वेंगुर्ले पोलीस ठाण्यात जमा केला होता.

याबाबत वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व सिंधुदुर्गनगरी सायबर शाखा येथील प्रथमेश गावडे यांच्या सहकार्याने वेंगुर्ले पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपा मठकर यांनी शोध घेऊन त्या मोबाईलचे मालक रामकृष्ण मोहन धुरी (रा. शेर्ले, ता. सावंतवाडी) यांची ओळख पटविल्यानंतर मोबाईल त्यांच्या ताब्यात देण्यात आला.

दरम्यान, रामकृष्ण धुरी यांनी बांदा पोलीस ठाण्यात १३ जानेवारीरोजी मोबाईल गहाळ झाल्याची सीईआयआर पोर्टलला अर्ज दिला होता. माणगाव येथील कृष्णा आडेलकर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

lost mobile returned
सिंधुदुर्ग : गुरांची अवैध वाहतूक करणार्‍या एकावर गुन्हा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news