Sindhudurg News : कोकिसरे-गावठणवाडीतील विद्यार्थिनीचा तापाने मृत्यू!

परिसरात हळहळ
Sindhudurg News
कोकिसरे-गावठणवाडीतील विद्यार्थिनीचा तापाने मृत्यू!
Published on
Updated on

वैभववाडी : कोकिसरे -गावठणवाडी येथील बारावीत शिकणारी करुणा प्रकाश वळंजू (१७) या विद्यार्थिनीचेे उपचारादरम्यान सिंधुदुर्गनगरी येथे निधन झाले. करुणा वळंजु ही वैभववाडी येथील हेमंत केशव रावराणे विद्यालयात इ.१२ वीच्या वर्गात शिकत होती.

मागील दोन दिवस ती सर्दी, तापामुळे आजारी होती. तिच्यावर वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्नात आले, मात्र तिची प्रकृती नाजुक असलयाने त्याच दिवशी तिला सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार करण्यात आले मात्र तिची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने तिला गोवा-बांबोळी रूग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. मात्र बांबेळीला नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. करुणा हिच्या अचानक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तिच्या पश्चात आई-वडील, बहिण, भाऊ, काका- काकी असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news