Sindhudurg News : खारेपाटण दुर्गच्या संवर्धनासाठी ‘कोकणचे शिलेदार’ची मोहीम

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्व बुरूज ते दुर्गा मंदिर तटबंदी स्वच्छतेला प्रारंभ
Sindhudurg News
खारेपाटण दुर्गच्या संवर्धनासाठी ‘कोकणचे शिलेदार’ची मोहीम
Published on: 
Updated on: 

कासार्डे : सुमारे १२०० वर्षांचा गौरवशाली इतिहास लाभलेल्या खारेपाटण दुर्गच्या संवर्धनासाठी ‘कोकणचे शिलेदार’ संघाने दसरा विशेष दुर्गसंवर्धन मोहिमेला सुरुवात केली आहे. झाडे-झुडपे आणि मातीच्या ढिगाऱ्यांमुळे झाकोळलेले खारेपाटण दुर्गचे ऐतिहासिक अवशेष मोकळे करून त्यांचे महत्त्व अधोरेखित करणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.

खारेपाटण दुर्गवर शिवकालीन आई दुर्गा देवीचे प्राचीन मंदिर आहे. नवरात्रोत्सवात घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होतात. दसऱ्याच्या दिवशी येथे भाविक तसेच पर्यटकांची मोठी गर्दी असते. या पार्श्वभूमीवर दुर्ग परिसर स्वच्छ करून किल्ल्याचे ऐतिहासिक स्वरूप अधिक स्पष्टपणे नागरिकांसमोर यावे, यासाठी संघाच्या सदस्यांनी श्रमदानातून ही मोहीम हाती घेतली आहे.

यापूर्वीही ‘कोकणचे शिलेदार’च्या माध्यमातून दुर्गावरील पायरी विहीर, महादरवाजा आणि ध्वज बुरुजाजवळील दरवाज मातीच्या ढिगाऱ्यांतून मोकळे करण्यात आले आहेत. या कामामुळे दुर्गावरील ऐतिहासिक वास्तूंचे स्वरूप पुन्हा समोर आले आहे. सध्या पूर्व बुरुजापासून आई दुर्गादेवी मंदिरापर्यंतची तटबंदी झाडे-झुडपे व मातीच्या विळख्यातून मुक्त करण्याचे काम सुरू आहे. स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर मातीखाली गाडले गेलेले इतर जुने ऐतिहासिक अवशेष शोधून ते मोकळे करण्याचे कामही हाती घेतले जाणार आहे. दुर्गांचे संवर्धन हे केवळ ऐतिहासिक वास्तूंचे जतन नसून, पुढील पिढ्यांपर्यंत हा समृद्ध वारसा पोहोचविण्याचे माध्यम आहे. त्यामुळे श्रमदानातून दुर्गसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या ‘कोकणचे शिलेदार’च्या या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news