सिंधुदुर्ग : केळूस येथे लोकवर्गणीतून वनराई बंधाऱ्याची पुर्नबांधणी

केळुस, मुणगी, माईनवाडा गावाला बंधारा वरदान ठरणार
Sindhudurg News
सिंधुदुर्ग : केळूस येथे लोकवर्गणीतून वनराई बंधाऱ्याची पुर्नबांधणी होणार आहे.
Published on
Updated on

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील केळूस बापडतेवाडी तारीसाणा येथील विस्तीर्ण वनराई बंधाऱ्याच्या पुर्नबांधणीचे काम पूर्ण झाले असून हा बंधारा लोकवर्गणीतून साकारण्यात आला आहे. केळुस, मुणगी व माईनवाडा गावाला वरदान ठरणारा बापाडतेवाडी तारीसाणा हा वनराई बंधारा ३४ मीटर लांबीचा व १.५ मीटर उंचीचा आहे.

या बंधाऱ्यासाठी केळुस सरपंच योगेश शेट्ये यांच्यासह ग्रामस्थ नितिन आजगावकर, तुकाराम राउळ, महेश रांजणकर, निवृत्ती भगत, विनायक मांजरेकर, नवीन वाक्कर, संतोष गोवेकर, रामू बुट्टे, राकेश भगत, तेजस भगत, राजन गोवेकर, विलास रेवणकर, हनुमंत आजगांवकर, अशोक भगत, शंकर आजगांवकर, विलास भगत, सज्जन राऊळ, शिवराम तांडेल, भाई केळूसकर, साई भगत, जगन्नाथ पावसकर, सुधीर प्रभू, मंथन आजगावकर यांच्यासह अनेकांनी मोलाचे योगदान दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news