Sindhudurg Accident : चहा पिऊन निघाले अन्‌‍ थेट 300 फूट दरीत कोसळले!

करूळ घाटात ट्रकचा भीषण अपघात; बाप-लेकाचा जागीच मृत्यू
Sindhudurg Accident News
Sindhudurg Accident News
Published on
Updated on

वैभववाडी : सिमेंटने भरलेला ट्रक करूळ घाटात तब्बल 300 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ट्रकचालक आणि क्लीनर असलेल्या बाप-लेकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, ट्रकचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. गुरुवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राजू प्रेमसिंग राजपूत (वय 59) आणि त्यांचा मुलगा राहुल राजू राजपूत (20, रा. कोचलगी तांडा, जि. विजापूर, कर्नाटक) अशी मृत बाप-लेकाची नावे आहेत.

...असा घडला अपघात

राजू हे स्वतःच्या ट्रकमधून गुलबर्गा येथून कोकिसरे (वैभववाडी) येथे सिमेंटची वाहतूक करत होते. पहाटे पावणेपाचच्या सुमारास गगनबावडा येथे चहा घेतल्यानंतर ते पुढे निघाले. करूळ घाट उतरताना दिंडवणेनजीक राजू यांचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक बॅरिकेडस्‌‍ तोडून थेट 300 फूट खोल दरीत कोसळला. त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकच्या चालकाने तातडीने 112 क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.

प्रयत्नांची शर्थ करत मृतदेह काढले बाहेर

माहिती मिळताच वैभववाडी पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर आणि त्यांच्या पथकाने सह्याद्री जीवरक्षक टीमच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले. अत्यंत अवघड दरीतून प्रयत्नांची शर्थ करत या टीमने आणि ग्रामस्थांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news