Sindhudurg News : कणकवली-वैभववाडीत अवकाळीचा तडाखा

गारपिटीने उडाली दाणादाण ः उरलासुरला आंबा-काजूही धोक्यात; शेतकरी हवालदिल
Unseasonal rain
कणकवली-वैभववाडीत अवकाळीचा तडाखा
Published on
Updated on

कणकवली : गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढला असतानाच गुरुवारी दुपारी कणकवली, वैभववाडी तालुक्यांत तसेच कसाल परिसरासह अनेक भागांत अवकाळी पाऊस झाला. कणकवली, वैभववाडी तालुक्यांच्या काही भागांत गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे काही प्रमाणात वातावरणात थंडावा निर्माण झाला होता.

गेल्या काही दिवसांपासून उष्म्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. गुरुवारी दुपारी 2 वाजेपर्यंत अक्षरशः सूर्य आग ओकत होता. साधारणपणे 2.30 ते 3 वा.च्या सुमारास मेघगर्जनेसह अवकाळी पावसास सुरुवात झाली. कणकवली, वैभववाडी तालुक्यांतील काही भागांत गारपिटीसह पाऊस झाला. चिमुकल्यांनी या गारा गोळा करण्याचा आनंद लुटला. सुमारे अर्धा ते एक तास पावसाची रिपरिप सुरूच होती. काही भागांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या. कनेडी, हरकुळ बुद्रुक, नाटळ, नांदगाव, कासार्डे, तळेरे आदी परिसरातही पावसाने हजेरी लावली. मेघगर्जनेमुळे वीजपुरवठा काही भागांत खंडित झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news