ITI Education : फोंडाघाट ‘आयटीआय’मध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

२१ जूनपर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन
Pudhari
ITI Education Pudhari
Published on
Updated on

फोंडाघाट : फोंडाघाट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शैक्षणिक सत्र २०२६ साठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी २१ जून २०२६ पर्यंत प्रवेश अर्ज दाखल करावेत, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य भूषण सोनवणे यांनी केले आहे. कमी खर्चात तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण देणारी तसेच रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, फोंडाघाट (आय.टी.आय) अनेक वर्षांपासून यशस्वीपणे प्रशिक्षण राबवित आहे.

यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत १) शीट मेटल वर्कर (पत्रे कारागीर), २) प्लंबर (नळ कारागीर), 3) इंटेरीअर डिझाईन अँड डेकोरेशन, ४) फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, ५) कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स आणि ६) मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी प्रवेश संकेतस्थळावर आधार नोंदणीनुसार ऑनलाईन अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह संस्थेत अर्ज निश्चित करावा. अर्ज निश्चित झाल्यानंतर पसंतीनुसार व्यवसायाची निवड करता येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी संस्थेत मार्गदर्शन केंद्राचीही स्थापना करण्यात आली आहे. आयटीआयचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतात. तसेच पदविका अभ्यासक्रमाद्वारे पुढे अभियांत्रिकी पदवीपर्यंत शिक्षण घेण्याचाही मार्ग खुला होतो. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण विशेषतः उपयुक्त ठरत असून कमी खर्चात तांत्रिक शिक्षण घेऊन स्वतःचा उद्योग सुरू करण्याची संधीही मिळते. या सुवर्णसंधीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news