Sindhudurg News : कळणे येथील महिला १० जुलैपासून बेपत्ता

‘आपला शोध घेऊ नका’ अशा आशयाची घरात ठेवली चिठ्ठी
Sindhudurg News
कळणे येथील महिला १० जुलैपासून बेपत्ता
Published on
Updated on

दोडामार्ग : कळणे येथील बँकेत पैसे काढण्यासाठी जाते असे, सांगून घराबाहेर पडलेली महिला घरी परतली नाही. अमृता अमित कदम (३२, मोरगाव-बौद्धवाडी) असे त्या महिलेचे नाव असून तिचे पती अमित वामन कदम यांनी ती बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलिस ठाण्यात दिली आहे.

वामन कदम (३९) यांनी फिर्यादीत म्हटले आहे, १० जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वा. च्या सुमारास त्यांची पत्नी अमृता कदम ही कळणे येथे बँकेत जाणार असल्याचे सांगून घरातून निघून गेली. त्यावेळी मुले शाळेत गेली होती, तर अमित कदम हे कामानिमित्त बाहेर गेले होते. संध्याकाळपर्यंत अमृता घरी न परतल्याने कुटुंबीयांनी कळणे परिसरासह नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला; मात्र ती कुठेही आढळून आली नाही.

विशेष म्हणजे घरातून जाताना तिने एक चिठ्ठी ठेवली असून, “माझा शोध घेऊ नये, मी नातेवाईकांकडे जात आहे,” असा उल्लेख त्यात केला आहे. तरीदेखील तिचा कोणताही ठावठिकाणा न लागल्याने कुटुंबीयांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. बेपत्ता महिलेची उंची अंदाजे ५ फूट, गोरा वर्ण, उभट चेहरा, लांब काळे केस, अंगात निळ्या रंगाची फुलांच्या नक्षीची साडी व निळा ब्लाऊज, खांद्यावर गुलाबी रंगाची पर्स, गळ्यात मंगळसूत्र तसेच पायात निळ्या रंगाच्या स्लीपर चप्पल होत्या. ही महिला कोठेही आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news