सिंधुदुर्ग : हिंदूंनी अन्यायाविरोधात एकत्र यावे : सुनील पवार

गोवा तिसवाडीत अत्याचारग्रस्तांना श्रद्धांजली
 Hat Katro Khamb
गोवा : तिसवाडी, जुने गोवा येथील हात कात्रो खांब येथे श्रद्धांजली अर्पण करताना सुनिल पवार व अन्य.pudhari photo
Published on
Updated on

कुडाळ : गोवा - तीसवाडी येथील हिंदूचा छळ करून खांबाला बांधून हात कापणार्‍या पोर्तुगीजांविरोधात निषेध म्हणून बुधवारी ख्रिसमसच्या दिवशी हात कात्रो खांबाची पूजा करून उपस्थित हिंदूंना एकत्र येण्याचे आवाहन शिवराज्याभिषेक समिती किल्ले रायगडचे अध्यक्ष सुनील पवार यांनी केले.

पोर्तुगीजांनी हाल करून मारलेल्या स्वाभिमानी हिंदूंसाठी एकत्र येऊयात, असे आवाहन सुनिल पवार यांनी केले होते. त्यानुसार 25डिसेंबरला शिवराज्याभिषेक समितीतर्फे त्यावेळच्या अत्याचारग्रस्त हिंदूंना तिसवाडी, जुने गोवा येथील हिंदूंचा हात कात्रो खांब येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.

पवार म्हणाले,आपले नवीन वर्ष शालिवाहन शके गुढीपाडवादिनी सुरु होते. 16 व्या व 17 व्या शतकामध्ये हिंदूंवरील अन्याय, अत्याचार, धर्मांतरण शिगेला येऊन पोहचले होते. पोर्तुगिजांकरवी होणार्‍या जुलमाने कळस जेव्हा गाठला होता. त्यांनी हिंदू सर्वसामान्य प्रजेला धर्मांतरित करण्यासाठी एक खांबच उभारला. हा खांब गोव्यातील आपल्याच कोणत्यातरी मंदिराचा होता.

हिंदूंना या खांबाला बांधून त्यांच्यावर अत्याचार करून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केली जायची. आणि धर्म स्वीकारला नाही तर हात छाटले जायचे. तोच हा तिसवाडी, जुने गोवे येथील आपला हिंदूंचा ’ हात कात्रो खांब’. नंतर छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराजांनी या पोर्तुगीजांवरती जबर वचक बसून हा अन्याय कायमस्वरूपी थांबवला. तरीही 25 डिसेंबर पासून या अत्याचारापासून अनाभिज्ञ असलेले आपले हिंदू गोव्यात ख्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी जातात,अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

यावेळी वैभव पवार, अमित राणे, मिकी शर्मा, गणेश गावडे, अमित वायंगणकर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news