सिंधुदुर्ग: आंबोलीत उद्यापासून हिंदू धर्म परिषदेचे आयोजन

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
Hindu Dharma Parishad
हिंदू धर्म परिषदेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करताना परमानंद महाराज, अवधूतानंद महाराज व इतर. (छाया : विराज परब)
Published on
Updated on

बांदा : गुरुवर्य श्री नवनीतानंद महाराज स्थापित सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा मठ, आंबोली येथे 3 ते 5 जानेवारी कालावधीत हिंदू धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले मार्गदर्शन करणार आहेत.

शुक्रवार, 3 रोजी सकाळी 9.30 वा. परमानंद महाराज आणि श्री अवधूत आनंद महाराज यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा, श्री स्वामी समर्थ प्रतिमा पूजन, श्री नवनीत आनंद महाराज प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन. सकाळी 10 ते 10.30 या वेळेत परमानंद महाराज यांच्या हस्ते होम हवन, 10.30 ते 12 या वेळेत राजेश कुंटे कल्याण नर्मदा परिक्रमा यांचे व्याख्यान, दुपारी 12 ते 2 या वेळेत राजेश मुधोळकर यांचे संभाषण व चर्चासत्र. दुपारी 2 ते 3 या वेळेत महाप्रसाद. सायंकाळी 3 ते 5 या वेळेत समीर लिमये यांचे ‘श्री समर्थ रामदास स्वामी इतिहास, कधी हिंदुत्व एक समर्थ दृष्टी’ याविषयी व्याख्यान. सायंकाळी 5 ते 7 या वेळेत जितेंद्र महाराज पाटील यांचे कीर्तन व प्रवचन. सायंकाळी 7 ते 8 या वेळेत नामजप, गुरुसंदेश वाचन. रात्री 8 ते 9 या वेळेत ह.भ.प.नवनीत यशवंतराव महाराज यांचे व्याख्यान. रात्री 9 ते 11 या वेळेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक मठांचे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम.

शनिवार 4 रोजी सकाळी 5 ते 6 या वेळेत काकड आरती, सकाळी 7.30 ते 8.30 या वेळेत परमानंद महाराज व अवधूतानंद महाराज यांच्या हस्ते होमहवन, सकाळी8.30 ते 10 या वेळेत गुरुचरित्र वाचन, सकाळी 10 ते 11 या वेळेत प्रमुख उपस्थितांचे परमानंद महाराज यांच्या हस्ते स्वागत व गुरुपूजन, सकाळी 11 ते 12 या वेळेत ह.भ.प.कावेरी मोडक महाराज यांचे प्रवचन, दुपारी 12 ते 2 या वेळेत ह.भ.प. हेमंत मणेरिकर यांचे प्रवचन, दुपारी 2 ते 3 या वेळेत महाप्रसाद, दुपारी 3 ते 4 या वेळेत ह.भ.प. दिनेश देशमुख यांचे हिंदू संस्कृतीवर व्याख्यान, दुपारी 4 ते 5 या वेळेत ह.भ.प.मदन बलकवडे यांचे प्रवचन, सायंकाळी 5 ते 7 या वेळेत संदीप महाराज मुंबई यांचा कीर्तनाचा कार्यक्रम, रात्री 7 ते 8 या वेळेत आरती, नामजप, गुरुसंदेश वाचन, रात्री 8 ते 10 या वेळेत सद्गुरु श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट कल्याण, ठाणे मठ, डोंबिवली मठ यांचे विविध प्रकारचे सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम.

रविवार 5 रोजी सकाळी 5 ते 6 यावेळी काकड आरती, सकाळी 7 ते 8 या वेळेत परमानंद महाराज यांच्या हस्ते होमवन, सकाळी 8 ते 9 या वेळेत कल्याण येथून येणार्‍या श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे स्वागत, सकाळी 9.30 ते 10 या वेळेत प्रमुख उपस्थितांचे परमानंद महाराज यांच्या हस्ते स्वागत व गुरुपूजन, सकाळी 9.30 ते 10 या वेळेत गुरुचरित्र वाचन, सकाळी 10 ते 11 या वेळेत सिंधू मित्र सेवा प्रतिष्ठान सावंतवाडीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण ठाकरे यांचे व्याख्यान, सकाळी 11 ते दुपारी1 या वेळेत ह.भ.प. देवराज महाराज यांचा कीर्तन कार्यक्रम. दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंत महाप्रसाद, दुपारी 3 वा.सांगता समारोह, आरती.

हिंदू धर्म परिषद निमित्त आयोजित विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news