Sindhudurg Rain : आंबोलीत अवकाळी मुसळधार!

पुढील आठवड्यापर्यंत हलक्या स्वरूपाच्या अवकाळीची शक्यता
Sindhudurg Rain update
आंबोलीत अवकाळी मुसळधार!
Published on: 
Updated on: 

आंबोली : दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर शुक्रवारी दुपारी सुमारे दोन तास आंबोली परिसरात जोरदार पाऊस कोसळला. अचानक कोसळलेल्या या पावसामुळे आंबोली परिसरात सर्वत्र धुके, हवेतील गारवा व घाटातील दऱ्यांमध्ये उतरलेले आकर्षक ढग असे नयनरम्य देखावे तयार झाले होते. पुढील आठवड्यापर्यंत अधूनमधून काही प्रमाणात हलक्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाची शक्यता आहे.

अल निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या मान्सूनवर मोठा परिणाम झाला. परिणामी, सद्या सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. याचा फटका आंबोलीलाही बसलेला असून सर्वच जलस्रोतातील पाणीसाठ्यात प्रचंड घट झालेली दिसून येते. मात्र, शुक्रवारी दुपारी मेघ गर्जनेसह गारवा युक्त वाऱ्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे परिसरातील पाण्याच्या साठ्यात किंचित वाढ होण्यास मदत झाली.

ढगाळ वातावरण व किमान तापमानाचे वाढ

कोकण आणि गोवा परिसरावर समुद्रसपाटीपासून ३.१ किमी उंचीवर असलेल्या चक्राकार वाऱ्यांची (सायक्लोनिक सर्क्युलेशन) तीव्रता सध्या कमी झाली असली, तरी ईशान्य मान्सून वाऱ्याच्या तीव्र झोतामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र व दक्षिण कोकणावर ढगांची दाटी पाहायला मिळत आहे. सदर ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान कमालीचे प्रभावीत झालेले असून परिणामतः आंबा व काजू पिकावर विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.