Sindhudurg Rain Alert | आज ‘यलो’ तर उद्यापासून तीन दिवस ‘ऑरेंज’ अलर्ट

Sindhudurg Rain Update
Sindhudurg Rain Alert | आज ‘यलो’ तर उद्यापासून तीन दिवस ‘ऑरेंज’ अलर्ट pudhari file photo
Published on
Updated on

कणकवली : भारतीय हवामान विभागाच्या बुलेटीननुसार महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्‍यामुळे कोकण किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊसाची शक्यता आहे. हवामान अंदाजानुसार सिंधुदुर्गात ५ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्‍यामुळे जिल्‍ह्यात गुरुवारी यलो अलर्ट तर शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

त्‍यामुळे या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग यांनी केले आहे. दरम्यान, जिल्‍ह्यात मंगळवारी रात्री तसेच बुधवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. या वादळी पावसामुळे काही ठिकाणी पडझड झाली. तर काही ठिकाणी झाडे पडून नुकसान झाले. गेल्‍या २४ तासांत सरासरी ९०.७५ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्‍यात सर्वाधिक पाऊस कुडाळ तालुक्यात झाला. त्‍याखालोखाल कणकवली आणि देवगड तालुक्‍यांतही सरासरी १०० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे येथील अंजली विष्णू रामाणे यांच्‍या घरावर झाड पडून नुकसान झाले; तर सावंतवाडी तालुक्‍यातील दांडेली येथे रस्त्यावर झाडे उन्‍मळून पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news