

सिंधुदुर्गनगरी : कडाक्याची थंडी व हवामानातील बदल यामुळे आंबा व काजू पिकाच्या झालेल्या संयुक्त पंचनामा आकडेवारीत तफावत असुन ती उत्पादनक्षम क्षेत्राशी जुळत नसल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवक यापैकी कोणीही प्रत्यक्ष शेतात न जाताच शेतकऱ्यांनी दिलेल्या सातबाराच्याच आधारे पंचनामे केले असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडुन केल्या जात आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणेच्या या पंचनामा कार्यपद्धतीबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच उत्पादनक्षम सर्वच क्षेत्राचे पंचनामे २० मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
यावर्षीच्या आंबा, काजू पिकावर कडाक्याची थंडी व हवामानातील बदलामुळे मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली असून शेतकरीही नुकसानभरपाईसाठी रस्त्यावर उतरला आहे. या अनुषंगाने कृषी, महसूल आणि ग्रामपंचायत या तीनही यंत्रणांनी संयुक्त पंचनामे करून अहवाल देण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते. यानुसार सादर करण्यात आलेल्या पंचनामा अहवालाबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त करीत यंत्रणांची कानउघाडणी केली आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, जिल्हयात आंब्याचे उत्पादनक्षम क्षेत्र २५६०२ हेक्टर एवढे आहे. काजूचे उत्पादनक्षम क्षेत्र ५८०३७ एवढे आहे. मात्र, तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार पंचनामा करावयाचे क्षेत्र आंब्यासाठी २१५७८.६७ हेक्टर तर काजूसाठी ३०६०९.३२ हेक्टर एवढे कमी करून दाखवले गेले आहे. त्यातही आतापर्यंतच्या कालावधीत पंचनामे केलेल्या क्षेत्राची आकडेवारीही फारच कमी आहे. टक्केवारी वाढविण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही केला जात आहे.
कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक यापैकी कोणही शेतात न जाता शेतकऱ्यांनी दिलेल्या सात-बाराप्रमाणे, पंचनामे केल्याचा आरोप वे संबंधित बागायतदार शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच दोन हेक्टरवरील क्षेत्राचे पंचनामे केले जात नाहीत. शेतकरी बाहेरगावी असल्याने दाखवली जात आहेत, अशा तक्रारी पंचनामे होत नाहीत, इत्यादी कारणे शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत. याची दखल घेत शेतकरी हित २० मेपर्यंत पंचनामे पूर्ण करून डोळ्यासमेर ठेवून तीनही यंत्रणांनी नुकसान भरपाईसाठी आवश्यक असणाऱ्या निधीचा प्रस्ताव शासन पालकमंत्री नीतेश राणे यंनी जिल्हा स्तरावर सादर करावा, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.