Nitesh Rane| पालकमंत्र्यांकडून मळगाव येथे भातशेती नुकसानीची पाहणी

शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकाच्या सद्यस्थितीची घेतली माहिती
Nitesh Rane
पालकमंत्र्यांकडून मळगाव येथे भातशेती नुकसानीची पाहणी
Published on: 
Updated on: 

सावंतवाडी : जिल्ह्यात दुष्काळ व भातशेतीची झालेली हानीची रविवारी पालकमंत्री नितेश राणे यांनी मळगाव -बादेकरवाडी येथील शेतकरी भास्कर रामा गावकर यांच्या बांधावर जात पाहणी केली. त्यांनी भाताची लोंबे हातात घेत अर्धवट वाढ झालेल्या भाताच्या पिका बाबत चिंता व्यक्त केली.

जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सावंतवाडी प्रांताधिकारी वीरसिंग वसावे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पंचायत समिती सभापती सुस्मीता जाधव, गटविकास अधिकारी नीलेश जाधव, सावंतवाडी मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई, संतोष राऊळ, मळगावचे माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री नितेश राणे यांनी सकाळी शेतकरी गावकर यांच्या भात शेतीत जात पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. प्रदीर्घ पावसाचा खंड, वाढलेले ऊन आणि पाण्याची कमतरता यामुळे भात पिकाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. भाताची वाढ खुंटली असून आलेल्या लोंब्यांमध्ये दाणे पुरेशा प्रमाणात न भरल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली. भात पिकावर करपा रोगासाठी औषधांची फवारणी करूनही अपेक्षित परिणाम झाला नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी पालकमंत्री यांच्यासमोर मांडली. यावेळी नुकसान झालेल्या भात शेती पिकाची शंभर टक्के भरपाई शासनाकडून देण्यात येईल असे आश्वासन ना.राणे यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news