Sindhudurg News : जिल्ह्यात ७४ हजार खासगी, तर ३२ सार्वजनिक गणेशमूर्तींची होणार प्रतिष्ठापना!

महागाई असतानाही उत्‍साहपूर्ण खरेदी : भक्तिमय वातावरण
Sindhudurg News
सावंतवाडी बसस्‍थानकावर आरोग्य विभागाचे पथक तैनात.
Published on
Updated on

संजय वालावलकर

ओरोस : गणेशोत्सवाला १४ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ४ हजार ३५१ घरगुती (खासगी) गणपती तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत ३२ ठिकाणी गणपती विराजमान होणार आहेत. गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात गणेशभक्त चाकरमानी दाखल झाले असून, ढोल-ताशांच्या गजरात वाजत गाजत ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घरोघरी गणपती मूर्त्या नेण्यासाठी अवघा सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज झाला आहे उद्यापासून घरोघरी आणि सार्वजनिक ग­­णेशोत्सव मंडळांची गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठापना मोठ्या धुमधडाक्यात होणार आहे यात अवघा सिंधुदुर्ग जिल्हा न्हावून निघाला आहे

जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून घराची रंगरंगोटी व सजावट बाजारापेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी दिसत होती. गणेशमूर्ती शाळा मध्ये रंगरंगोटीचा अंतिम हात फिरवला जात होते.काही ठिकाणी तर गेल्या दोन दिवसांपूर्वीपासूनच गणेश मूर्तीची कामे पूर्ण झाली आहेत केवळ बाप्पाच्या आगमनाची वाट पाहिली जात आहे.१४ सप्टेबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी व गणेशभक्त येऊ लागल्याने येणाऱ्या चाकरमान्यामधून तापाची व इतर आजाराची लक्षणे दिसणाऱ्याची आरोग्य तपासणी करण्यासाठी सर्व रेल्वे स्थानके,बस स्थानकावर आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत आरोग्य तपासणी करून जोखीमीच्या रुग्णांना जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले जाणार आहे.

गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने यांनी केले आहे व कुठेही अनुचित प्रकार घडू नये,कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी घेऊन आनंदात गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर गणेशभक्ताची गैरसोय होऊ नये याची वाहतुकीची कोंडी होऊ नये याची दक्षता घेण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत. सर्वजनिक मंडळांनी ध्वनी प्रदूषण होता नये याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे तर जिल्हाधिकाऱ्याच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व रेल्वे व बसस्थानके, फिक्स पॉइंट, भुईबावडा, करूळ, फोंडा आणि आंबोली घाट मार्गावर व महामार्ग या सर्व ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात अपघात होऊ नये यासाठी महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. एकूणच गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडावा यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. तर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सर्वांची लगबग सुरू असून जोरदार तयारी सुरू आहे.तर गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनीही कड़क पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. यावर्षी एस टी स्थानक व रेल्वे स्थानकावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

खाजगी ७४ हजार ३५१ गणेशमुर्तींची स्थापना

जिल्हयात ७ ४ हजार ३५१ गणेश मुतीची घरोघरी स्थापना होणारअसल्यामुळे आजपासूनच घरोघरी गणेश मूर्ती नेण्याची लगीन घाई सुरू झाली आहे जिल्ह्यात दोडामार्ग ६ हजार ३२ बांदा २ हजार६९५ सावंतवाडी १० हजार १०३ वेगुर्ले ५हजार ४८१ निवती ३हजार ३०२ कुडाळ १२ हजार ४४५ सिधुदुर्गनगरी २हजार ४९५ कणकवली ९हजार ७१० मालवण ४ हजार ५०६ आचरा २हजार ४२५ देवगड ६हजार ५४० विजयदुर्ग ५हजार ५७२ वैभववाडी ५हजार ३४५ आदीपोलीस ठाणे निहाय एकूण जिल्ह्यात ७४,३५१ गणेश मूर्तींची उद्या १४ सप्टेंबर रोजी धूमधडाक्यात स्थापना होणार आहे

३२ ठिकाणी सार्वजानिक गणपती

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग- ४,सावंतवाड़ी ७,आचरा १,मालवण २, कणकवली ५,बांदा १,कुडाळ ४, वेंगुर्ला ३, देवगड १, वैभववाडी ४ असे ३२ सार्वजानिक गणपतीची स्थापना होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news