सिंधुदुर्ग : फोंडा घाटात इंधनाच्या टँकरचा स्फोट; एकाचा मृत्यू

दीडतासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प
fuel tanker explosion
फोंडाघाट ः अपघातानंतर पेटलेला टँकर पूर्णपणे जळून खाक झाला. (छाया ः तुषार नेवरेकर)
Published on
Updated on

फोंडाघाट ः कोल्हापूरहून सिंधुदुर्गात येणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल टँकर फोंडा घाटात खिंडीपासून अर्धा कि. मी. अंतरावरील घोडतळीनजीकच्या दुसर्‍या वळणावर चालकाचा ताबा सुटून उलटला. उलटल्यानंतर या टँकरचा स्फोट होऊन टँकरने पेट घेतला. त्यात टँकर खाक झाला, पण या अपघातात टँकरमधील एकाचा होरपळून मृत्यू झाला.

पेटलेल्या टँकरच्या ज्वाळा एवढ्या भीषण होत्या की, रस्त्याच्या अलीकडचे-पलीकडचे काहीच दिसत नव्हते. रस्त्यावरच ही दुर्घटना घडल्याने फोंडा घाटचा मार्ग सुमारे दीडतासाहून अधिक काळ ठप्प झाला होता. ही घटना बुधवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास घडली.

या अपघातग्रस्त टँकरमध्ये चालक, क्लिनर किंवा अन्य कोणी होते का? त्यांचे काय झाले? याची माहिती मिळाली नाही. मात्र, एका व्यक्तीचा मृतदेह रेलिंगनजीक होरपळलेल्या स्थितीत आढळून आला. तो चालक असण्याची शक्यता असून, त्याने स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला की टँकरबरोबर खाली कोसळला? हे समजू शकले नाही.

घटनेची माहिती मिळताच कणकवलीचे पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. फोंडाघाटातील आणि दाजीपूरमधील नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे कोल्हापूरकडे जाणारी व सिंधुदुर्गकडे येणारी वाहतूक सुमारे दीड तासाहून अधिक काळ ठप्प झाली होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या तीन-तीन कि. मी. च्या रांगा लागल्या होत्या. कणकवली न. पं. च्या अग्निशमन बंबालाही पाचारण करण्यात आले होते.

...तर मोठी दुर्घटना घडली असती

अपघात घडला त्यावेळी मोठ्या स्फोटचा आवाज झाल्याची माहिती दाजीपूरमधील काहीजणांनी दिली. काहीजण खिंडीजवळ उभे होते, तेही आवाजाच्या दिशेने खाली आलेत. सुदैवाने घाटात ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला. जर वस्तीच्या ठिकाणी ही घटना घडली असती, तर मोठी दुर्घटना घडली असती. हा टँकर सिंधुदुर्गातीलच असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news