Sindhudurg Drowning Death: पागाने मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमाराचा पाण्यात बुडून मृत्यू

देवगड तालुक्यातील तांबळडेग-मोर्वे खाडीतील घटना
Sindhudurg Drowning Death
Sindhudurg Drowning Death: पागाने मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमाराचा पाण्यात बुडून मृत्यूPudhari
Published on
Updated on

देवगड : देवगड तालुक्यातील तांबळडेग-मोर्वे खाडीत पागाने मासेमारीसाठी गेलेल्या एका मच्छीमाराचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी पहाटे घडली. जतीन चंद्रकांत कोचरेकर (वय ४५, रा. तांबळडेग, मधलीवाडी) असे मृत मच्छीमाराचे नाव आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जतीन कोचरेकर हे रविवारी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास तांबळडेग-मोर्वे खाडीत पागाने मासेमारी करण्यासाठी गेले होते. मासेमारी करत असताना त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

त्यांचा मृतदेह रविवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास तांबळडेग–मोर्वे खाडीच्या संगमाजवळ आढळून आला. याप्रकरणी सुरेशदेव विश्वनाथ सारंग (रा. तांबळडेग, मधलीवाडी) यांनी देवगड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणपती गावडे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news