Sindhudurg News| बांबर्डेतील शेतकऱ्यांचे वन कार्यालयासमोर उपोषण

फळबाग नुकसानीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक
Farmers Hunger Strike
Farmers Hunger Strike
Published on: 
Updated on: 

दोडामार्ग : वन्यप्राण्यांकडून शेती व फळबागांचे होणारे नुकसान, नुकसानभरपाई देण्यास होणारी दिरंगाई, पंचनाम्यांतील फेरफार आणि वनविभागाच्या विविध योजनांमधील गैरव्यवहारांविरोधात बांबर्डे येथील दौलत राणे, मदन राणे आणि सिद्धेश राणे यांनी बुधवारी पासून दोडामार्ग वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.

दोडामार्ग तालुक्यात वन्य हत्ती, रानडुक्कर, गवे, माकडे, साळिंदर आदी वन्यप्राण्यांकडून भातशेतीसह काजू, नारळ, सुपारी, केळी आणि अन्य फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वारंवार नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पुरेशी आणि वेळेत नुकसानभरपाई मिळत नसल्याची तक्रार आहे. तसेच पंचनाम्यांमध्ये शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय फेरफार केल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

राजकिय पक्षांचा पाठिंबा

शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी जि.प. माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय गवस, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबू गवस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, दोडामार्ग नगरसेवक चंदन गावकर, काॅंग्रेस जिल्हा सरचिटणीस सुभाष दळवी, ठाकरे शिवसेनेच्या महिला उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) उपजिल्हाप्रमुख संदीप गवस, स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, काँग्रेसचे पदाधिकारी बाळा धाऊसकर आणि तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय देसाई यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पाठिंबा व्यक्त केला.

केळी नुकसानभरपाईच्या निकषांवर सवाल

उपोषणकर्त्यांशी वनपरिक्षेत्र अधिकारी संभाजी पाटील यांच्याशी चर्चा केली. संदेश राणे यांनी नुकसानभरपाईच्या निकषांबाबत प्रश्न उपस्थित केला. सहा गुंठे क्षेत्रात सात हजार केळीची लागवड केल्याचे सांगितले जात असताना अशा प्रकरणांत सरसकट नुकसानभरपाई कशी दिली जाते? अशी विचारणा त्यांनी केली. नुकसानभरपाई निश्चित करताना प्रत्यक्ष लागवड, क्षेत्र आणि नुकसानीची पडताळणी नेमकी कशी केली जाते, याबाबत स्पष्टता देण्याची मागणीही पुढे आली. वनक्षेत्रपाल संभाजी पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. मात्र शेतकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावण्याची मागणी केली. यामुळे उपस्थित अधि़्काऱ्यांना माघारी फिरावे लागले. संध्याकाळी उशिरा पर्यंत उपोषण सुरूच होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news