सिंधुदुर्ग विभागाला 79 लाख 61 हजारांचे उत्पन्न

गतवर्षीच्या तुलनेत साडेबाराने लाखाने घट; 15 टक्के सवलतीसह घटलेल्या भारमानाचा फटका
ST Bus News
सिंधुदुर्ग विभागाला 79 लाख 61 हजारांचे उत्पन्नFile Photo
Published on
Updated on

कणकवली : 29 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सवासाठी गावा आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्ग एसटी विभागाने जादा वाहतूक केली. यामध्ये 264 गाड्यांचा वापर करण्यात आला. यातून सिंधुदुर्ग विभागाला निव्वळ 54 लाख 63 हजार 327 रू. तर सवलतीच्या उत्पन्नासह एकूण 79 लाख 61 हजार 207 रू. उत्पन्न मिळाले. गतवर्षी 291 गाड्यांचा वापर करत सिंधुदुर्ग विभागाला जादा परतीच्या वाहतुकीतून 65 लाख 58 हजार 180 रू. तर सवलतीच्या उत्पन्नासह 92 लाख 3 हजार 673 रू. एवढे उत्पन्न मिळाले होते. यंदा गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 12 लाख 42 हजार 466 रू. एवढी घट उत्पन्नात घट झाली. ऑनलाईन बुकींगच्या 15 टक्के सवलतीसह काही प्रमाणात घटलेल्या भारमानाचाही फटका सिंधुदुर्ग विभागाला बसला.

सिंधुदुर्ग विभागाने दरवर्षीप्रमाणे चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी मुंबईसह उपनगरांमध्ये जादा वाहतूकीच्या गाड्या सोडल्या होत्या. त्यामध्ये स्वत:च्या 131 आणि अन्य विभागातील 133 अशा 264 गाड्यातून यंदा 17 लाख 597 प्रवाशांनी परतीचा प्रवास केला. हे भारमान 93.79 टक्के होते. यामध्ये 430 फेर्‍यांमधून 2 लाख 8 हजार 213 कि.मी.चा प्रवास झाला. यामध्ये सिंधुदुर्ग विभागाला यंदा सवलतीच्या उत्पन्नासह 79 लाख 61 हजार 207 रू. उत्पन्न मिळाले. यामध्ये सर्वाधिक फेर्‍या कणकवली आगारातून सुटल्या.

कणकवली आगाराने 123 फेर्‍यांमधुन 57 हजार 307 कि.मी.चा प्रवास करत सवलतीच्या उत्पन्नासह एकूण 25 लाख 2 हजार 189 रू. उत्पन्न मिळविले. सावंतवाडी आगाराने 45 फेर्‍यांमधून सवलतीच्या उत्पन्नासह 8 लाख 16 हजार 434 रू., मालवण आगाराने 59 फेर्‍यांमधुन सवलतीच्या उत्पन्नासह 10 लाख 10 हजार 739 रू., देवगड आगाराने 91 फेर्‍यांमधून सवलतीच्या उत्पन्नासह 16 लाख 50 हजार 932 रू., विजयदुर्ग आगाराने 73 फेर्‍यांमधुन सवलतीच्या उत्पन्नासह 12 लाख 17 हजार 409 रू., कुडाळ आगाराने 20 फेर्‍यांमधुन सवलतीच्या उत्पन्नासह 3 लाख 95 हजार 603 रू. तर वेंगुर्ले आगाराने 19 फेर्‍यांमधून सवलतीच्या उत्पन्नासह 3 लाख 67 हजार 901 रू. एवढे उत्पन्न मिळविले. गतवर्षी सिंधुदुर्ग विभागाच्या 509 फेर्‍या परतीच्या प्रवासासाठी झाल्या होत्या. तर यंदा त्यामध्ये 79 फेर्‍यांची घट होवून त्या 430 वर आल्या. गतवर्षीच्या तुलनेत निव्वळ उत्पन्नात यंदा 10 लाख 94 हजार 853 रू. एवढी घट झाली तर सवलतीच्या उत्पन्नासह 12 लाख 42 हजार 466 रू.ची घट झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 4.67 टक्क्यांनी भारमान घटले. प्रवाशांची संख्या ही 7067 ने घटली. अर्थात याबरोबरच यंदा महामंडळाने ऑनलाईन बुकींगसाठी तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली होती, त्याचाही फटका यंदाच्या उत्पन्नाला बसल्याचे सिंधुदुर्ग एसटी विभागाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news