Sindhudurg News : सभेला गैरहजर अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस द्या

वैभववाडी पं.स.च्या पहिल्याच सभेत सभापती सिध्देश रावराणे यांचे आदेश
Sindhudurg News
Sindhudurg News
Published on
Updated on

वैभववाडी : पंचायत समितीच्या पहिल्याच सभेला काही जबाबदार खाते प्रमुख कोणतीही पूर्व सूचना न देता गैरहजर राहिले आहेत, त्या गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस द्या, असे आदेश सभापती सिद्धेश रावराणे यांनी पहिल्याच सभेत दिल्याने लेट लतीफ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

वैभववाडी तालुका पंचायत समिती पहिलीच सभा वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह सभागृहात सभापती सिध्देश रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला उपसभापती साची कोलते, मंगेश लोके, देवानंद पालांडे, सुवर्णा संसारे,साधना नकाशे, गटविकास अधिकारी श्री.वाघ व खाते प्रमुख उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच सभापती श्री.रावराणे यांनी उपस्थित खाते प्रमुखांची उपस्थिती पाहिली, त्यावेळी काही महत्त्वाचे जबाबदार खाते प्रमुख या मिटींगला हजर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत त्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले.वैभववाडी तालुक्याच्या विकासामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड आम्ही खपवून घेणार नाही असे सांगत यापुढे पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी यांनी बाहेर जाताना त्याची पूर्व सूचना दिली पाहिजे. विभागातील कर्मचाऱ्यांनी याची नोंद घ्यावी अशी सूचनाही सभापती श्री.रावराणे यांनी प्रशासनाला केली.

उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचारी निवासस्थान मोडकळीस आले असून अपघात घडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी काही अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल सभापतींनी केला. दवाखान्याच्या आजूबाजूला झाडी झुडपे वाढली आहेत, ग्रामपंचायतीला याची कल्पना दिली तरी ग्रामपंचायत सुद्धा सहकार्य करील यासाठी तुम्ही लोकप्रतिनिधींशी बोलायला हवे. चर्चा केली तर प्रश्न सुटू शकतील अशी सूचना देवानंद पालांडे यांनी केली.तर हे निवासस्थान तात्काळ दुरुस्त करण्याचा ठराव मंगेश लोके यांनी मांडला तसेच 108 रुग्णवाहिका ही कोल्हापूर सीपीआर रुग्णालयासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी श्री.लोके यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news