सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आजपासून मनाई आदेशPudhari Photo
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आजपासून मनाई आदेश
ओरोस : आगामी विधानसभा निवडणूक, राजकीय पक्षाच्या बैठका, तसेच वैयक्तीक व सामाईक मागणीकरीता उपोषणे मोर्चा, संप, निदर्शन, रस्ता रोको वगैरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रमांचे वेळोवेळी नियोजन करण्यात येते, अशावेळी आंदोलनकर्ते यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी मंगळवार १५ ऑक्टोंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात येत असल्याची अधिसूचना जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी जारी केली आहे.

