Sindhudurg News : वालावल मुड्याचा कोंड येथे दरडीचा दगड घरावर कोसळला!

सुदैवाने अनर्थ टळला : ३० हजारांचे नुकसान : नानेलीत घराची पडझड
Sindhudurg News
वालावल मुड्याचा कोंड येथे दरडीचा दगड घरावर कोसळला!
Published on
Updated on

कुडाळ : कुडाळ तालुक्यात सोमवारीही पावसाची संततधार सुरूच होती. या अतिवृष्टीत ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडून नुकसान झाले. वालावल मुड्याचा कोंड मुर्तळीवाडी येथील सुधाकर मधुकर राऊळ यांच्या घरावर लगतच्या दरडीचा दगड कोसळला. या घटनेत सुदैवाने मोठा अनर्थ टळला; मात्र घराचे सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना सकाळी १० वा.च्या सुमारास घडली. तेथे घरालगत मोठा धोका निर्माण झाला आहे.

कुडाळ तालुक्यात तीन दिवस धुवाँधार पाऊस कोसळत आहे. तालुक्यात गेल्या चोवीस तासांत ९२ मि.मी. एवढी पावसाची नोंद झाली आहे. वालावल मुड्याचा कोंड मुर्तळीवाडी येथील सुधाकर मधुकर राऊळ यांच्या घरावर लगतच्या दरडीचा दगड कोसळला. यात घराच्या भिंतींना तडे गेले तसेच माती कोसळून नुकसान झाले आहे. तसेच वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने दुपारी दोन वाजताच्या सुमारास नानेली येथील श्रीमती दत्ताराम आरेकर यांच्या राहत्या घरावरील कौल व पत्रे पडून अंशत : नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही. याबाबतची नोंद तहसीलदार कार्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. तालुक्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. पावसाची संततधार अधूनमधून सुरूच होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news