Sindhudurg News : देवगड आगाराला 6 लाख 57 हजारांचे उत्पन्न

कुणकेश्वर यात्रोत्सवामुळे एसटीचे उत्पन्न वाढले
ST News |
देवगड आगाराला 6 लाख 57 हजारांचे उत्पन्नPudhari Photo
Published on
Updated on

देवगड ः श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा प्रवासी सेवेतून देवगड आगाराने सर्व सवलती सह 13 हजार 249 किमी द्वारे, 23 हजार 366 प्रवाश्यांची वाहतूक करीत 23 गाड्यांच्या 485 प्रवासी फेऱ्यांद्वारे रु. 6 लाख 57 हजार 483 रु. एवढे उत्पन्न मिळवले. या यात्रोत्सवानिमित्त देवगड-कुणकेश्वर -कणकवली रेल्वेस्टेशन या बरोबरच देवगड-बोरिवली मार्गांवर एक जादा प्रवासी फेरी सोडण्यात येऊन भाविक भक्तांंची विशेष सोय केली. या यात्रा काळात सर्वाधिक उत्पन्न कणकवली रेल्वेस्टेशन देवगड-कुणकेश्वर या प्रवासी फेरीतून चालक ए. के. इंदप, वाहक व्ही. आर. सावंत, यांनी 1256 प्रवासी वाहतूक करीत रु. 57 हजार 892 आणले.

नांदगाव- तळेरे- कुणकेश्वर मार्गावर चालक एस. यु.बटवाले, वाहक जे. एस. गोरुले यांनी 1257 प्रवासी द्वारे रु 49 हजार 470 असे द्वितीय क्रमांकाचे उत्पन्न मिळविले, चालक पी. एस. तोरसकर, वाहक एस. एस. साटम यांनी 989 प्रवासी द्वारे रु. 40 हजार 237 रु. उत्पन्न मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. चतुर्थ क्रमांक चालक एन. एल. साटम,वाहक एस. पी. परब यांनी 1047 प्रवासी वाहतूक करीत 35 हजार 481 रु. उत्पन्न आणले. चालक एम. डी. जाधव, वाहक आर. व्ही. रावरे यांनी 874 प्रवासी वाहतूक करून रु. 35 हजार041 रु. उत्पन्न आणले. गतवर्षी पेक्षा यंदा 2071 किमीमध्ये वाढ करून विनासवलत उत्पन्नात रु. 20 हजार 754 एवढी वाढ झाली आहे.

सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक दीपक घोडे, विभागीय वाहतूक अधिकारी विक्रमकुमार देशमुख, यंत्र अभियंता सुजित डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप, यांच्या नेतृत्वाखाली स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर, सहा वाह. निरीक्षक सचिन डोंगर यांनी यात्रा सेवा सुरळीत व सुरक्षितपणे पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news