

देवगड : सौंदाळे वाडा केरपोई येथील पूजा अजय कणेरे (वय ४२) या १२ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजल्यापासून जामसंडे येथील एका हॉस्पिटल परिसरातून बेपत्ता असल्याची फिर्याद तिचे पती अजय अनंत कणेरे (४२) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा ह्या बुधवारी दुपारच्या सुमारास पती अजय कणेरे यांच्यासोबत मराठे हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी आल्या होत्या. हॉस्पिटलमधून त्या एकट्या बाहेर येत तेथील परिसरातून त्या बेपत्ता झाल्या, असे फिर्यादीतून नमूद करण्यात आले आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज राऊत करीत आहेत.