Devgad Accident | देवगड–नांदगाव मार्गावर डंपरच्या धडकेत रस्ते कामगाराचा हात निकामी; चालकाविरुद्ध गुन्हा

दाभोळे तिठ्यानजीक चायनीज हॉटेल परिसरात अपघात
 Accident News
Accident News pudhari photo
Published on
Updated on

Devgad Nandgaon Road Dumper Crash Worker Injured

देवगड : देवगड–नांदगाव मार्गावरील काँक्रीटीकरणाच्या कामादरम्यान डंपरच्या धडकेत वाहतूक व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या रस्ते कामगाराचा डावा हात गंभीर जखमी होऊन अखेर कोपरापासून काढावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मे रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता दाभोळे तिठ्यानजीक चायनीज हॉटेल परिसरात हा अपघात झाला. देवगड–नांदगाव मार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असताना निलेश गणपत मुंबारकर (वय ४५, रा. मिठमुंबरी, साखडेवाडी, ता. देवगड) हे एका लेनवरील वाहतूक व्यवस्थापनाचे काम करत होते.

 Accident News
Devgad News | ‘आम्हाला देवगडमध्येच रोजगार हवा’, रोजगारप्रश्नी युवक उतरले रस्त्‍यावर, भर पावसात बाईक रॅली!

त्यावेळी डंपर (क्र. एमएच-१२-एक्सएम-९५५३) चालक नीरज रघुराज कोल (वय २२, मूळ रा. मध्यप्रदेश, सध्या रा. देवगड) याने डंपर निष्काळजीपणे मागे घेतल्याचा आरोप आहे. हॉर्न न वाजवता आणि आवश्यक खबरदारी न घेतल्याने डंपरने मुंबारकर यांना मागून धडक दिली. धडकेनंतर ते रस्त्यावर पडले असता डंपरचे चाक त्यांच्या डाव्या हातावरून गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.

मुंबारकर यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी गोव्यातील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, हाताची गंभीर दुखापत आणि संसर्गाचा धोका लक्षात घेऊन डॉक्टरांना त्यांचा डावा हात कोपरापासून काढून टाकावा लागला.

 Accident News
Devgad Liquor Raid | देवगडमध्ये 'एलसीबी'ची मोठी कारवाई; ७.१८ लाखांची गोवा-महाराष्ट्र बनावटीची दारू जप्त

या प्रकरणी निलेश मुंबारकर यांच्या फिर्यादीवरून देवगड पोलीस ठाण्यात डंपर चालक नीरज रघुराज कोल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिलकुमार पवार करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news