Sindhudurg News : श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे ३० व ३१ रोजी वार्षिक कार्यक्रम

दोन्ही दिवस सायंकाळी काही काळ मंदिर रहाणार बंद
Sindhudurg News
श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे ३० व ३१ रोजी वार्षिक कार्यक्रम
Published on
Updated on

देवगड : श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्यावतीने ३० ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते सायं. ७ वा. पर्यंत देवस्थानचा ‘दादरा’ हा वार्षिक कार्यक्रम होणार आहे. या वार्षिकावेळी कुणकेश्वर मंदिर परिसर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यात कुणकेश्वर महापुरुष पार ते कुणकेश्वर मंदिर, मारुती मंदिर तिठा ते कुणकेश्वर मंदिर, मिठमुंबरी बीच ते कुणकेश्वर मंदिरापर्यंतचे रस्ते बंद ठेवण्यात येणार असून भाविक, भक्तगण व पर्यटकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी केले आहे.

तसेच सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी सायं. ४ ते ५ वा. या कालावधीत मंदिरातील ‘भावई’ वार्षिक होणार असल्याने या वेळेत मंदिरातील दर्शन व्यवस्था बंद राहील व वार्षिकी कामकाज पार पडल्यावर दर्शन व्यवस्था पूर्ववत सुरू होईल. याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घेऊन देवस्थान ट्रस्ट- कुणकेश्वर आणि प्रशासकीय यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहनही देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष श्री. तेली यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news