Devgad Cobra Rescued | तळेबाजार सोसायटीच्या गोडाऊनमध्ये शिरलेल्या कोब्राला जीवदान

सर्पमित्र सुदेश पाटील यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने सापाला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले
Devgad Talebazar Cobra Rescued
Devgad Talebazar Cobra RescuedPudhari
Published on
Updated on

Devgad Talebazar Cobra Rescued

देवगड : देवगड तालुक्यातील तळेबाजार येथील सोसायटीच्या गोडाऊनमधील पोत्यांमध्ये शिरलेल्या इंडियन स्पेक्टेकल्ड कोब्रा जातीच्या विषारी सापाला सर्पमित्र सुदेश पाटील यांनी जीवदान दिले. सापाला सुरक्षितपणे बाहेर काढून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

तळेबाजार सोसायटीच्या गोडाऊनमध्ये साप शिरल्याची माहिती जागरूक नागरिक विनायक शिवाजी सावंत यांनी सर्पमित्र सुदेश पाटील यांना दिली. माहिती मिळताच सुदेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी गोडाऊनमधील पोत्यांमध्ये इंडियन स्पेक्टेकल्ड कोब्रा जातीचा विषारी साप असल्याचे निदर्शनास आले.

Devgad Talebazar Cobra Rescued
Sindhudurg News : एसटीच्या एनसीएमसी कार्ड वितरणातील सावळागोंधळ

साप पोत्यांमध्ये शिरल्याने त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे आव्हान होते. सर्पमित्र सुदेश पाटील यांनी आपले सहकारी जयदीप पाटील यांच्या मदतीने सापाला काळजीपूर्वक बाहेर काढले. त्यानंतर सापाला कोणतीही इजा न करता सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

यावेळी सुनील धरणे, रविंद्र कुळये, विनायक सावंत, रिया लाड, जयप्रकाश लाड यांच्यासह सोसायटीचे कर्मचारी उपस्थित होते. सर्पमित्रांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे विषारी सापाला जीवदान मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news