

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग बँकेमधील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त शिपाई पदांवर भरतीसाठी सहकार खात्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सहकार खात्याकडून ३२ रिक्त शिपाई पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार बँकेने कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स असो. या संस्थेची निवड केली असून त्या संस्थेमार्फत भरती प्रक्रिया प्रोसेस सुरू केली आहे.
नोकर भरतीमधील महत्त्वाचे मुद्दे
जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य - यासाठी उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरताना जिल्ह्यातील रहिवाशी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) अपलोड करणे आवश्यक आहे. वयोमर्यादा किमान २१ व कमाल ४० वर्षे राहील. त्यासाठी उमेदवाराचा जन्म ३० ऑगस्ट २००५ नंतरचा व ३० ऑगस्ट १९८६ यापूर्वीचा नसावा. शैक्षणिक पात्रता - किमान १२ वी पास. ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी २० ते ३० ऑगस्ट पर्यंत. अधिक माहितीसाठी http://www.kopbankasso.co.in या अधिकृत संकेतस्थळावर पहावे. परीक्षा रविवार ६ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्गनगरी येथे होईल.
परीक्षेसंबंधी उमेदवाराला कॉल लेटर उमेदवाराच्या मेलवर पाठविले जाईल. उमेदवाराने कॉल लेटर डाऊनलोड करून त्याची प्रत काढावयाची आहे. परीक्षा केंद्रावर परीक्षा कॉल लेटर, सहीत ओळखीसाठी आधारकार्ड/पॅनकार्ड (ओरिजनल) सोबत असणे आवश्यक राहील. परिक्षा निकाल जाहीर झालेनंतर त्यामधून गुणानुक्रमे आवश्यक उमेदवारांना तोंडी मुलाखतीस बोलविणेत येईल. उमेदवारास ऑनलाईन अर्ज भरणे अनुषंगाने काही शंका असल्यास त्यांनी एजन्सीच्या help@kopbankasso.co.in या ईमेलवर संपर्क साधावा, असे बँकेने कळविले आहे