कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडवून दिलेल्या वर्दे येथील दामिनी किरण पालव खून प्रकरणातील संशयित आरोपी साहिल विश्राम धुरी याच्या पोलिस कोठडीची मुदत शनिवारी, २४ ऑक्टोबर संपल्याने त्याला दुपारी कडक पोलिस बंदोबस्तात पुन्हा कुडाळ दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले. तपासाच्या दृष्टिकोनातून आरोपीकडे अधिक सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याने न्यायालयाने आरोपी साहिल धुरी याला २७ ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच ४ दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आरोपीवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम १०३ (१) अंतर्गत खुनाचा गंभीर गुन्हा दाखल आहे.
सुनावणीदरम्यान कुडाळचे पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी न्यायालयासमोर तपासातील आतापर्यंतची महत्त्वपूर्ण प्रगती मांडली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेला सुरा, आरोपीचे कपडे, मोबाईल तसेच गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली हिरोहोंडा दुचाकी जप्त केली असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली.
तपासात अनेक अनुत्तरित प्रश्न; पोलिसांचा न्यायालयात युक्तिवाद
तपासी अधिकारी कुडाळ पोलिसांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले, संशयित आरोपीने हत्येसाठी वापरलेला सुरा नेमका कुणाकडून विकत घेतला? या संपूर्ण कटात त्याचे कोणी सहकारी सहभागी होते का? तसेच घटना घडवण्यापूर्वी त्याने संबंधित भागाची रेकी केली होती का? अशा विविध संशयास्पद मुद्द्यांचा उलगडा करण्यासाठी आरोपीची सखोल विचारपूस करणे अत्यंत गरजेचे आहे.तपासाची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि या हत्याकांडामागचे गूढ पूर्णपणे उकलण्यासाठी पोलीस प्रशासनाने वाढीव कोठडीची मागणी केली. न्यायालयाने पोलिसांची ही मागणी ग्राह्य धरत संशयित आरोपी साहिल धुरी याला २७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास कुडाळ पोलिस निरीक्षक विकास बडवे करीत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडवून दिलेल्या वर्दे येथील दामिनी किरण पालव खून प्रकरणातील संशयित आरोपी साहिल विश्राम धुरी याच्या पोलिस कोठडीची मुदत शनिवारी, २४ ऑक्टोबर संपल्याने त्याला दुपारी कडक पोलिस बंदोबस्तात पुन्हा कुडाळ दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले. तपासाच्या दृष्टिकोनातून आरोपीकडे अधिक सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याने न्यायालयाने आरोपी साहिल धुरी याला २७ ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच ४ दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आरोपीवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम १०३ (१) अंतर्गत खुनाचा गंभीर गुन्हा दाखल आहे.