Nitesh Rane| सरसकट पंचनामे, मदतही सरसकट मिळणार : पालकमंत्री नितेश राणे

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार पंचनाम्यांची मुदत वाढविणार
Nitesh Rane
Nitesh Rane
Published on: 
Updated on: 

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा ट्रिगर-२ मध्ये समाविष्ट झाल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत कोणताही दुजाभाव केला जाणार नाही. सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये, अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

शेतकऱ्यांना आवश्यक असलेली मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाशी चर्चा करून पुढील कार्यवाही केली जाईल. पंचनामे सरसकट करण्याची मागणी मान्य केली असून, पिकांच्या नुकसानीचा आढावा घेऊन मदतीची प्रक्रिया पुढे सुरू ठेवली जाईल, पंचनामे करण्याची मुदत वाढविण्याची आवश्यकता असेल तर तोही निर्णय घेतला जाईल, असे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.

केवळ नैसर्गिक संकटाच्या काळात आर्थिक मदत देण्यापुरते मर्यादित न राहता, भविष्यातील संकटांचा सामना करण्यासाठी सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ना. राणे यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात बारामती कृषी तंत्रज्ञानाच्या सहकार्याने आंबा आणि काजू उत्पादकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून मार्गदर्शन करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आंबा-काजू बागायतदारांना योग्य मार्गदर्शन करून उत्पादनवाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हवामानातील बदलांचा शेतीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांना अधिक सक्षम करणे, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आणि उत्पादनासाठी केवळ नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून राहण्याची गरज कमी करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

जिल्ह्याला कृषी विकासाचे मॉडेल बनविण्याचा प्रयत्न

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना सरसकट मदत आणि दीर्घकालीन शेती विकासासाठी एआय तंत्रज्ञान, अशा दोन्ही पातळ्यांवर सिंधुदुर्गात प्रयत्न सुरू आहेत. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी व्हावेत, यासाठी जिल्ह्याला कृषी विकासाचे मॉडेल बनविण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news