

ओरोस : लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विठ्ठल भगवान शिंदे (वय 21, रा. हिवाळे-सडेवाडी, ता. मालवण) या युवकावर सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
संबंधित युवकाने फिर्यादीचे मनाविरुद्ध लैंगिक अत्याचार केले अशी फिर्याद दिल्यावरून आचरा पोलीस ठाणे वरून पाठवण्यात आलेल्या गुन्ह्यावरून सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्यातभारतीय न्याय संहिता 2023, चे कलम 64(1),64(2)() प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 17 डिसेंबर 2025 रोजी 9 ते 23 जानेवारी 2026 रोजी 11.30 वा. जैतापकर कॉलनी, ओरोस येथे घडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याबाबतचा तपास तपासीक अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सूरज पाटील करीत आहेत.