

कणकवली : कासार्डे येथे एका ठिकाणी प्लास्टरचे काम करत असताना उंचावरून पडून दिनेशकुमार सहानी (३८, मूळ. रा.बिहार ) या कामगाराचा मृत्यू झाला.
तो प्लास्टर करत असताना परांची तुटल्याने खाली पडून डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला. त्याला कासार्डे प्रा.आ.केंद्रात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. याबाबतची खबर त्याचा सहकारी मजीदकुमार सहानी याने दिली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.