Sindhudurg Crime : मोरगावात दुधाळ गायीची गोळी झाडून हत्या!

शेतकऱ्याची पोलिसांत तक्रार
Crime News
Crime NewsPudhari Photo
Published on
Updated on

दोडामार्ग : मोरगाव येथील शेतकरी गोविंद बाळा दळवी यांच्या दुधाळ गायीवर अज्ञात व्यक्तीने बंदुकीतून गोळी झाडल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. ही घटना शिकारीच्या उद्देशाने घडली की जाणीवपूर्वक वैमनस्यातून गायीला लक्ष्य करण्यात आले? याबाबत अद्याप स्पष्टता नसून दोडामार्ग पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद दळवी यांनी सोमवारी नेहमीप्रमाणे आपली गुरे चरण्यासाठी सोडली होती. सायंकाळी सर्व गुरे परत आली. मात्र एक दुधाळ गाय घरी परतली नाही. त्यामुळे दळवी यांनी परिसरात तिचा शोध घेतला. अंधार झाल्याने शोधमोहीम थांबवावी लागली. ­­­

मंगळवारी सकाळी पुन्हा शोध घेत असताना घरालगतच्या काजू बागेत संबंधित गाय मृतावस्थेत आढळून आली. जवळ जाऊन पाहिले असता गायीच्या पोटातून रक्तस्राव झाल्याचे निदर्शनास आले. प्राथमिक पाहणीत गायीच्या पोटावर बंदुकीची गोळी लागून ती आरपार गेल्याचे दिसून झाले. त्यामुळे गायीचा जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून अज्ञात व्यक्तीविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी गोविंद दळवी यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news