Sindhudurg Crime : मुंबई-गोवा महामार्गावर एलसीबीचा मोठा दणका; अवैध गुटख्यासह ३०.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त

ओरोस येथे कारवाई; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Sindhudurg Crime  : मुंबई-गोवा महामार्गावर एलसीबीचा मोठा दणका; अवैध गुटख्यासह ३०.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त
Published on
Updated on

कुडाळ : महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) मोठा दणका दिला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील ओरोस येथील खर्येवाडी परिसरात केलेल्या कारवाईत २१ लाख ६३ हजार ४५० रुपयांचा गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ, तसेच ८ लाख ५० हजार रुपयांचा अशोक लेलँड 'बडा दोस्त' टेम्पो असा एकूण ३० लाख १३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तिघांविरुद्ध सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sindhudurg Crime  : मुंबई-गोवा महामार्गावर एलसीबीचा मोठा दणका; अवैध गुटख्यासह ३०.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त
Palghar Gutkha Seized | पालघर एलसीबीची मोठी कारवाई; ५१.५४ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

ही कारवाई काल शुक्रवारी ३ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ओरोस येथील खर्येवाडीतील खालसा पंजाबी ढाब्यासमोर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर करण्यात आली. बांदा येथून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोतून महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक होत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार वाहन तपासणीदरम्यान संशयित टेम्पो थांबवून झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.

Sindhudurg Crime  : मुंबई-गोवा महामार्गावर एलसीबीचा मोठा दणका; अवैध गुटख्यासह ३०.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त
Jalgaon crime news | जळगावात 'विमल'चा बंपर स्टॉक जप्त; एमआयडीसी पोलिसांची डिझो पेट्रोल पंपाजवळ धडक कारवाई

या प्रकरणी गोपाळ राजाराम गवस (३४, रा. दाणोली अन्नपूर्णावाडी, ता. सावंतवाडी), शिरीष सुभाष गवळी (३५, रा. माठेवाडा, सावंतवाडी) आणि सिद्धेश सुभाष केसरकर (३४, रा. आळेवाडी, बांदा, ता. सावंतवाडी) यांच्याविरुद्ध अन्नसुरक्षा व मानके कायदा, 2006 तसेच भारतीय न्यायसंहिता, 2023 मधील विविध कलमान्वये सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदुर्ग कडून देण्यात आली.

Sindhudurg Crime  : मुंबई-गोवा महामार्गावर एलसीबीचा मोठा दणका; अवैध गुटख्यासह ३०.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त
Gutkha smuggling : बुलढाण्यात गुटखा तस्करीचा पर्दाफाश! नाकाबंदीत ७० लाखांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईदरम्यान 21 लाख 63 हजार 450 रुपयांचा गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांचा साठा तसेच 8 लाख 50 हजार रुपयांचे अशोक लेलँड 'बडा दोस्त' वाहन (टेम्पो) असा एकूण 30 लाख 13 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल विल्सन डिसोझा, आशिष जामदार तसेच पोलीस कॉन्स्टेबल महेश्वर समजीसकर आणि ऋषिकेश टोपले यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news