Sindhudurg Theft : दोन महिलांचे साडेआठ लाखांचे दागिने लंपास

कणकवली-सावंतवाडीत बसस्थानकांवर घडले चोरीचे प्रकार; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
Crime News
कणकवली-सावंतवाडीत बसस्थानकांवर घडले चोरीचे प्रकारFile Photo
Published on
Updated on

कणकवली/ सावंतवाडी : उन्हाळी सुट्टी व लग्नसराई यामुळे सध्या बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी आहे. या गर्दीचा फायदा घेत चोरी करणारे चोरटेही सक्रिय झाले आहेत. मंगळवारी व बुधवारी कणकवली व सावंतवाडी बसस्थानकांवर चोरट्यांनी दोन महिलांचे दागिने व पर्स चोरल्याच्या घटना घडल्या. कणकवली-तळेरे येथील घटनेत महिलेचे साडेचार लाखांचे तर सावंतवाडी येथील घटनेत सुमारे चार लाखांचे दागिने चोरट्यांनी लांबवले. अशाप्रकारच्या वाढत्या घटनांमुळे एसटी प्रवाशांमध्ये भीतीची वातावरण निर्माण झाले आहे.

अरुळे (ता. वैभववाडी) येथील प्राची नारायण खांबल (वय ४८, रा. बोरिवली) या तळेरे बसस्थानकात एसटी मध्ये चढत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या पर्समधील सोन्याच्या दागिन्यांचा डबा चोरला. त्यात सुमारे साडेचार लाखांचे दागिने होते. याप्रकरणी प्राची खांबल यांच्या तक्रारीवरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी १२.३५ वा. च्या सुमारास घडली.

कणकवली तालुक्यातील नरडवे येथील सौ. क्रांती सावंत या सावंतवाडी कारिवडे या ठिकाणी साखरपुड्यासाठी जात होत्या. एसटी प्रवासात त्यांच्या पर्समध्ये ठेवलेल्‍या डबीतील सुमारे ३ लाख ९० हजार किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिल्‍यानंतर अज्ञात संशयिताविरोधात सावंतवाडी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news