सिंधुदुर्ग: राजकोट येथे शिवरायांचा पुतळा उभारणीस प्रारंभ

Statue of Shivaji Maharaj: सिंधुदुर्गात 60 फूट पुतळा नव्याने साकारणार
Shivaji Maharaj statue
किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा नव्याने उभारण्यात येत असून कामाच्या फाऊंडेशनची खोदाई सुरू केली आहे.pudhari photo
Published on
Updated on

मालवण ः मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा नव्याने उभारण्यात येणार आहे. या कामाच्या फाऊंडेशनची खोदाई सुरू करण्यात आली आहे. कांस्य धातूपासून 60 फूट उंचीचा 8 मि.मी. जाडीचा पुतळा याठिकाणी उभारण्यात येणार आहे.

राज्य सरकारने याठिकाणी 60 फूट उंच पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिले आहे. राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीने याआधी गुजरातमधील ‘स्टॅट्यू ऑफ युनिटी’ या सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते. देशभरात मोठमोठे पुतळे दर्जेदार पद्धतीने उभरण्याचा मोठा अनुभव त्यांना आहे.

राज्य शासनाने राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केली होती. इतर निविदांची तुलना केल्यानंतर राम सुतार यांच्या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. कास्य धातूपासून 60 फूट उंचीचा 8 मी.मी. जाडीचा पुतळा तयार होत आहे. डोक्यापासून पायापर्यंत पुतळ्याची उंची 60 फुट इतकी असणार आहे. तर पुतळा ज्यावर उभा असेल तो 3 मीटर उंचीचा मजबूत असा चौथरा बनविण्यात येणार आहे. निविदेनुसार 100 वर्ष टिकेल असा पुतळा बांधण्याची अट घातली गेली आहे. तर 10 वर्ष पुतळ्याची देखभाल आणि दुरूस्ती करण्याचीही अट घालण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news