सिंधुदुर्ग : विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शांततेत सुरू

सिंधुदुर्ग : कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक शांततेत सुरू
Sindhudurg: Constituency Election for Konkan Division Graduate Constituency of Legislative Council
सिंधुदुर्ग : विधानपरिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक Pudhari Photo
Published on
Updated on

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा

विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज (बुधवार) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ३४ मतदान केंद्रांवर पदवीधर मतदार शांततेत ह्क्क बजावत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १८ हजार ५५१ मतदारांची अंतिम मतदार यादी निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यात मतदार संख्या वाढल्यामुळे मतदान केंद्र ३१ इतकी निश्चित करण्यात आली आहेत. यासाठी १८२ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आली आहेत. चोख पोलीस बंदोबस्तात ही निवडणूक पार पडत आहेत.

कासार्डेसह प्रत्येक मतदान केंद्रावर महायुती व महाविकास अघाडीचे बुध आहेत. या मतदारसंघातून एकूण १३ उमेदवार रिंगणात असून त्याचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. प्रामुख्याने महायुतीचे निरंजन डावखरे विरूद्ध महाविकास अघाडीचे रमेश किर यांच्यात मुख्य लढत दिसून येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news