

ओरोस, पुढारी वृत्तसेवा: कर्जमाफी, पीकविमा रक्कम, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन काजू, आंबा पिकाला हमीभाव यासह विविध प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज (दि.४) धरणे आंदोलन करण्यात आले. (Sindhudurg Congress Protest)
यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. वरील मागण्यांबाबत महाराष्ट्र सरकारने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ईर्षाद शेख, प्रभारी सिंधुदुर्ग तथा प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अजिंक्य देसाई, साईनाथ चव्हाण, अॅड. दिलीप नार्वेकर, प्रकाशजैतापकर, मेघनाथ धुरी, विनायक मेस्त्री, प्रवीण वरुणकर, रवींद्र म्हापसेकर, किरण टेंम्बुलकर, प्रदीप मांजरेकर, विधाता सावंत, विजय सावंत, आत्माराम सोकटे, जेम्स फर्नांडिस, तुषार भाबल, महेश परब, मधुकर लुडबे, प्रवीण मोरे, कमलाकर हिंदळेकर, हेमंत माळकर, सुरज घाडी, अनिकेत दहिबावकर, बाबू गवस, महेंद्र मांजरेकर, केतनकुमार गावडे, उमेश कुलकर्णी, संजय लाड, महेंद्र सांगेलकर, चंद्रशेखर जोशी, तबरेज शेख, अभय शिरसाट, विजय प्रभू, कृष्णा धाऊसकर आदी उपस्थित होते.