सिंधुदुर्ग: ‘स्वच्छ माझे आंगण अभियान’ प्रभावी राबवावे

Swachh Maje Aangan: जिल्हा प्रशासनाचे ग्रामपंचायत,पंचायत समितीला आवाहन
Cleanliness Campaign
सिंधुदुर्ग: ‘स्वच्छ माझे आंगण अभियान’ प्रभावी राबवावे pudhari photo
Published on
Updated on

ओरोस ः स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा- 2 अंतर्गत ‘स्वच्छ माझे आंगण अभियान’ 1 ते 20 जानेवारी कालावधीत संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे, असे आवाहन जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक व उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी केले आहे.

प्रत्येक कुटुंबाने स्वच्छतेचे उच्चतम मानक राखत ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनवणे, वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर आणि दैनंदिन स्वच्छतेचे पालन, घरगुती कचर्‍याचे वर्गीकरण व पुनर्वापर, कंपोस्ट खत तयार करणे, परसबाग व सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डा व पाझरखड्ड्यांचा वापर करणे हे या अभियानाचे उद्दिष्टे आहेत.

या अभियानात स्वच्छतेचे आदर्श उदाहरण ठरलेल्या कुटुंबांचा 26जानेवारी रोजी ग्रामसभेत प्रशस्तीपत्र, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात स्वच्छतेचा आदर्श निर्माण करून इतरांना प्रेरित करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने या अभियानात सहभागी व्हावे. घरातील कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व शौचालयांच्या स्वच्छतेबाबत नियमांचे पालन करावे. यासाठी गटविकास अधिकारी, पं.स.विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी. महिला बचत गट व ग्रामस्थांनी या अभियनात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक विशाल तनपुरे यांनी केले आहे.

अभियान कालावधी व टप्पे

अभियान कालावधी: 1 ते 20 जानेवारी 2025

पडताळणी कालावधी: 21 ते 24 जानेवारी 2025

पात्र कुटुंबांना निमंत्रण: 25 जानेवारी 2025

प्रशस्तीपत्र व सन्मान: 26 जानेवारी 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news