Sindhudurg News : औषध विक्रेत्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

ऑनलाईन औषधी विक्री बंद करण्यासह अन्य मागण्यांकडे वेधले शासनाचे लक्ष
Sindhudurg News
औषध विक्रेत्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा
Published on
Updated on

ओरोस : ऑनलाईन औषधी विक्री बंद करा, कार्पोरंटद्वारे डिस्काउंट बंद करा, अँटी बायोटीक्स व व्यसनकारक औषधांना अनियंत्रीत प्रवेश, बनावट औषधापासून देश वाचवा, ऑनलाईन फार्मसीमुळे होणारे गंभीर परिणाम, या विरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. याची दखल न घेतल्यास आम्हाला कायमस्वरूपी सेवा बंद करून तीव्र लढा उभारावा लागेल, असा इशारा सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असो. ने दिला.

या मोर्चाचे नेतृत्व अध्यक्ष आनंद रासम, सचिव संजय सावंत यांनी केले. जिल्हाभरातील केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी, मेडिकल व्यवसायिक, विक्रेते या मोर्चात सहभागी झाले होते. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कार्पोरेटद्वारे डिस्काउंट बंद करा, बनावट औषधापासून देश वाचवा, अशा विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या. याबाबत संघटनेने प्रसिद्धिस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, औषध व्यापार व सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नाबाबत अखिल भारतीय संघटनेच्या माध्यमातून हे एकदिवसीय बंद आंदोलन करण्यात आले व जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ४५० पेक्षा जास्त औषध विक्रेत्यांचे प्रतिनिधीत्व करणारी ही संस्था आहे.

शासनाच्या औषध विक्री व व्यवसायाबाबतच्या नवीन धोरणांमुळे सार्वजनिक आरोग्य तसेच सामान्य औषध विक्रेत्यांच्या अस्तित्वावर गंभीर परिणाम होत आहे. याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री व विविध शासकीय विभाग संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊन याबाबत कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. यामुळे औषध व्यापार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. मोठ्या कार्पोरेट कंपन्या ई फार्मसी सारख्या माध्यमातून औषधांचा बेकायदेशीर व अनियंत्रित व्यापर करत आहेत. तरी शासनाने अनियंत्रित शोषणात्मक किंमत धोरण १८ ऑगस्ट २०१८ व २६ मार्च २०२० अधिसूचना मागे घ्यावी, अशी आमची प्रमूख मागणी आहे.

ऑनलाईन औषध प्लॅटफॉर्मच्या अनियंत्रित वाढीमुळे औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा-१९४० व सन १९४५ चा रुग्ण सुरक्षा नियमाचे गंभीर उल्लंघन होत आहे. योग्य प्रिस्किप्शन तपासणी शिवाय औषधांची विक्री, प्रिस्क्रिप्शाचा पुनर्वापर व बनावट प्रिस्क्रिप्शन, ॲटी बायोटीक्‍स व व्यसनधारक औषधांचा अनियंत्रित प्रवेश,फार्मासिस्ट व रुग्ण यांच्यात थेट संवादाचा अभाव, बनावट व अयोग्य साठवणूक केलेल्या औषधाचा धोका, ॲटी मायक्रोबियल रेझिस्टन्स मध्ये वाढ, AI निर्मीत प्रिस्क्रिप्शनवरही औषधाची विक्री ही सामान्य वापरातील वस्तू नसून त्या विक्रीसाठी कठोर नियंत्रण व व्यावसायिक देखरेख आवश्यक आहे.

या प्रणालीमध्ये कोणतीही स्थिती सार्वजनिक आरोग्यास थेट धोका निर्माण करते, अशी परिस्थिती कायदेशीर दृष्ट्या ही संशयास्पद असून चुकीचा औषध वापराचा आरोग्यास धोका निर्माण करणार ठरू शकतो. आज अनेक कार्पोरेट कंपन्याना उभारण्याच्या सवलती देऊन निष्पक्ष स्पर्धेला बाधा आणत आहेत. लहान व मध्यम केमिस्टच्या अस्तित्वाला धोका निर्माण करत आहेत. बाजारात असंतुलित परिस्थिती निर्माण करत आहेत. अनैतिक व व्यावसायिक स्पर्धा करीत आहेत. यामुळे ग्रामीण व अर्ध शहरी भागातील औषश विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात येऊन औषधाची उपलब्धता व ग्राहकास औषधी विकत घेणे परवडण्याची क्षमता कमी होईल. तरी कोविड आपत्ती कालावधी पुरती जारी केलेल्या ही सूचना त्वरित मागे घ्यावी , अशी मागणी या निवदेनाद्वारे जिल्हा औषध विक्रेता संघटनेने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news