Sindhudurg Crime : युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार प्रकरणी युवकावर गुन्हा दाखल

कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
Girl Abuse Case
युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार प्रकरणी युवकावर गुन्हा दाखल File Photo
Published on: 
Updated on: 

कणकवली : मानसिकदृष्ट्या विकलांग असलेल्या वीस वर्षीय युवतीवर धमक्या देऊन सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार कणकवली पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. त्यानुसार आरोपी शैलेश शशिकांत मेस्त्री (२८, वरवडे - सुतारवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी शैलेश पसार झाला असल्याची माहिती तपासी अंमलदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश पवार यांनी दिली.

याबाबत पीडित युवतीच्या आईने फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, फिर्यादी महिला गोवा राज्यात राहायला असते. तिची मुलगी कणकवली तालुक्यातीलच आपल्या गावात काही कुटुंबीयांसह राहते. काही दिवसांपूर्वी पीडित मुलगी आपल्या आईकडे राहायला आली होती. सदर मुलीच्या पोटात दुखत होते, याबाबत तिच्या आईने विश्वासात घेऊन विचारणा केली असता लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला.आरोपी शैलेश याने युवतीवर नोव्हेंबर २०२५ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत सातत्याने लैंगिक अत्याचार केले. याबाबत कोणालाही काहीही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली, अशी माहिती पीडित मुलीने आपल्या आईला दिली. त्यानुसार आईने आपल्या मुलीसह कणकवली पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. दरम्यान, पीडित मुलगी गर्भवती नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती देखील कणकवली पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.