Sindhudurg Accident : कारची दुचाकीला धडक बसून युवकाचा मृत्यू

मळगाव जोशी मांजरेकरवाडी येथील घटना
Sindhudurg Accident
कारची दुचाकीला धडक बसून युवकाचा मृत्यू
Published on
Updated on

सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावरील मळगाव जोशी मांजरेकरवाडी येथील सर्कलवर रस्ता क्रॉस करताना टाटा पंच कारची दुचाकीला धडक बसून नामदेव उमेश आजगावकर (२०, रा.मळगाव) या युवकाचा उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. तर या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात बुधवारी संध्याकाळी ६.४५ वा.च्या सुमारास झाला.अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील मळगाव जोशी मांजरेकरवाडी येथील सर्कल या ठिकाणी संध्याकाळी नातेवाईकांसोबत दुचाकी वरून रस्ता ओलांडून पलीकडे जात असताना गोव्याच्या दिशेने सुसाट वेगाने जाणाऱ्या टाटा पंच कार ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीच्या मागे बसलेल्या नामदेव आजगावकर हा उडून बाजूला पडला. तर चालक नातेवाईक हे देखील

बाजूला जाऊन पडले. अपघाताची माहिती समजताच ग्रामस्थांनी तातडीने हायवेवर धाव घेतली. गंभीर जखमी तरुण नामदेव आजगावकर याला उपचारासाठी वाहनात घालून रुग्णालयात नेत असताना अति रक्तस्त्राव झाल्याने त्याचा वाटेतच मृत्यू झाला. तर दुसरा नातेवाईक याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच सहा पोलिस निरीक्षक हर्षद हिंगे, पो उपनिरीक्षक अविनाश पाटील, पो अनिल धुरी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास सावंतवाडी पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news