Sindhudurg News : बोर्डवे रेल्वे स्टेशनच्या मागणीसाठी संघर्ष समितीचे उपोषण

नगराध्यक्ष संदेश पारकर यांची उपोषणस्थळी भेट घेऊन चर्चा
Sindhudurg News
बोर्डवे रेल्वे स्टेशनच्या मागणीसाठी संघर्ष समितीचे उपोषण
Published on
Updated on

कणकवली : बोर्डवे येथे रेल्वे स्टेशनला मंजुरी मिळावी या मागणीसाठी दशक्रोशी संघर्ष समितीच्या वतीने 27 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12 वा. पासून बोर्डवे रेल्वे फाटक येथे उपोषण सुरू करण्यात आले आहे. मागणी मान्य न झाल्यास रेल रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. शनिवारी कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली.

बोर्डवे रेल्वेस्टेशन दशक्रोशी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष तथा ओसरगावचे माजी उपसरपचं बबली राणे यांच्यासह अनेक ग्रामस्थ बोर्डवे रेल्वे फाटक येथे उपोषणात सहभागी झाले आहेत. शनिवारी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उपोषणस्थळी भेट देत रेल्वे अधिकाऱ्यांशी संवाद साधून नागरिकांच्या मागण्या मांडल्या. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी या मागणीकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे आश्वासन देत प्रत्यक्ष कार्यवाहीसाठी सुमारे सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असे स्पष्ट केले. तसेच या कामासाठी अंदाजे 30 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. संबंधित विभागाकडे याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी संदेश पारकर म्हणाले की, बोर्डवे रेल्वे स्टेशन मंजुरीसाठी लागणारी सर्वतोपरी मदत केली जाईल. यासंदर्भात जिल्ह्यातील मंत्री, खासदार, तसेच राज्य सरकारच्या जबाबदार मंत्र्यांकडे व रेल्वे मंत्र्यांचीही भेट घेऊन पाठपुरावा करू असे आश्वासित केले. उपोषणस्थळी विलास परब, जगन्नाथ राणे, प्रमोद कावले, महादेव राठवड, मोहन येनडे आदींनी भेट दिली. तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक राजेश सुरावडे, दुर्गेश यादव, युवराज पाटील, होमगार्ड प्रशांत गोसावी, होमगार्ड मंदार सुर्वे हेही उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news