Sindhudurg Fraud : बिअर शॉपी मॅनेजरकडून साडेसहा लाखांची फसवणूक

मालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
Sindhudurg Fraud News
सांगलीच्या व्यावसायिकाची 45 लाखांची फसवणूकfile photo
Published on
Updated on

कणकवली : कणकवली बाजारपेठेतील हॉटेल रिलॅक्स बार व बिअर शॉपीमध्ये मॅनेजर म्हणून कामास असलेला तुषार नंदकुमार मसूरकर (रा. कलमठ) याने बार व बिअर शॉपीच्या अकाऊंटवरून 6 लाख 50 हजार रुपये तसेच व्यवसायामध्ये जमलेल्या रकमेमध्ये विश्वासाचा गैरफायदा घेऊन अपहार व फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद रिलॅक्स बार व बिअर शॉपी मालक गुरुनाथ काळसेकर (रा. जानवली) यांनी कणकवली पोलिसात दिली आहे.

ही घटना सन2016 पासून ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीत घडली. याबाबत गुरुनाथ काळसेकर यांनी कणकवली पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या बार व बिअर शॉपीची देखभाल करण्याकरीता 2009 पासून तुषार मसुरकर हा कामास होता. 2024-25 या व्यवसायाचे स्टेटमेंट त्यांनी सीए यांच्याकडे तपासणीसाठी दिले असता बिअर शॉपीच्या अकाऊंटवरून 6 लाख 50 हजार एवढी रक्कम कश्मिरा ट्रेडर्सच्या नावे ऑनलाईन न जाता सदरची रक्कम दुसऱ्याच अकाऊंटवर ट्रान्स्फर झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तुषार मसूरकर याने आपली फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच त्याने एका बँकेची पिग्मीही स्वतःच्या नावावर उघडून ती रक्कम तो बार व बिअर शॉपीमध्ये जमलेल्या रकमेतून देत होता.

2016 पासून आपण जानवली येथील बिल्डिंगच्या बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी दिवसभर तेथे असल्याने तुषार मसुरकर यांच्या ताब्यात बार व बिअर बारची चावी देऊन व्यवसायाची सर्व सूत्रे दिली. मात्र सीए यांनी आपणास या व्यवसायात अफरातफर झाल्याची कल्पना दिल्याने आपण अकाऊंट तपासले असता 2016 पासून तुषार मसुरकर याने आपल्या संमती शिवाय स्वभावाचा गैरफायदा घऊन बार व बिअर शॉपीच्या अकाऊंटमधून तसेच जमलेल्या रकमेमध्ये अफरातफर केले असल्याची शक्यता आहे. ही बाब आपल्या लक्षात आल्याने तो 18 डिसेंबर 2025 रोजी आपणास न सांगता चावी बारमधील एका कामगाराकडे देऊन निघून गेला. फोनद्वारे संपर्क करूनही त्याचा फोन बंद असल्याचे समजून आले. तरी त्याने आपल्या विश्वासाचा फायदा घेऊन बिअर शॉपीच्या अकाऊंटवरून तसेच व्यवसायामध्ये जमलेल्या रकमेमध्ये अपहार करून फसवणूक केल्याचे गुरुनाथ काळसेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news