आरवली : स्मार्ट मीटर बसविण्याच्या नावाखाली महावितरणकडून वीज ग्राहकांची सर्रास लूट सुरू असून मीटर बसवू न देणार्या ग्राहकांना अवाच्या सव्वा सरासरी बिले पाठवून आणि परमनंट डिस्कनेक्टची भीती दाखवून जबरदस्ती केली जात आहे, असा गंभीर आरोप जि. प. सदस्य आणि वेंगुर्ला तालुका वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय गावडे यांनी केला आहे. या प्रश्नावर न्याय मिळेपर्यंत महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून तिथून हलणार नाही, असा इशारा संजय गावडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
ज्या ग्राहकांना पूर्वी ६० ते ७० युनिटचे बिल येत होते त्यांना १५० ते २०० युनिटचे तसेच ज्यांना २०० ते ३०० युनिटचे बिल येत होते त्यांना स्मार्ट मीटर बसविल्यावर ८०० ते ९०० युनिटचे बिल येत असल्याच्या तक्रारी वेंगुर्ला तालुक्यातून मोठ्या प्रमाणात येत आहेत, असे गावडे म्हणाले.
परमनंट डिस्कनेक्टच्या नावाखाली जबरदस्ती
सर्वात गंभीर प्रकार म्हणजे परमनंट डिस्कनेक्टचा वापर. ज्या ग्राहकांचे थकबाकीमुळे किंवा इतर कारणाने कनेक्शन तोडले आहे, त्यांना अवाच्या सव्वा बिल काढून पुन्हा जोडणीसाठी स्मार्ट प्रीपेड मीटरची अट घातली जात आहे. वेंगुर्ल्यात अनेक ठिकाणी ग्राहकाला कल्पना न देता, गुपचुप मीटर बदलले जातात, असा आरोप श्री. गावडे यांनी केला आहे. विरोध केला तर अरेरावीची भाषा वापरली जाते, जाणूनबुजून मीटर डिस्कनेक्ट करून नंतर स्मार्ट मीटरची सक्ती केली जाते.
सध्या कोकणात पावसाने दगा दिला आहे. शेती नाही, उत्पन्न नाही, आंबा पीक धोक्यात आहे. तरूणांना रोजगार नाही. अल्प पगारात कुटुंब चालवायचे की वीज बिल भरायचे, असा प्रश्न गोरगरिबांसमोर आहे. वीज ग्राहक संघटनेच्या मागण्यांमध्ये स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबवावी, ज्यांचे मीटर खराब झाले आहेत, त्यांना पूर्वीप्रमाणे रेग्युलर पोस्टपेड मीटर बसवून द्यावेत, सरासरी बिलाच्या नावाखाली अवाच्या सव्वा बिले काढणे थांबवावे, जबरदस्तीने परमनंट डिस्कनेक्ट करणे बंद करावे, मीटर तपासणी ग्राहकासमोर, लेखी अहवालासह करावी, ज्यांचे जुने मीटर चालू आहेत, त्यांचे रिडिंग घेणे पूर्ववत सुरू करावे, वीज दर गोवा राज्याच्या धर्तीवर कमी करावेत. तसेच ग्राहकांचा मीटर बंद पडलेला असेल किंवा ग्राहकांच्या मीटरचे रिडिंग न घेता अंदाजे युनिट वाढवून देण्यात येणारी भरमसाठ वीज आकारणी थांबवावी यांचा समावेश आहे. या मागण्यांचा विचार न झाल्यास न्याय मिळेपर्यंत महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून तिथून हलणार नाही, असा इशारा संजय गावडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
स्मार्ट मीटर बसविण्याच्या नावाखाली महावितरणकडून वीज ग्राहकांची सर्रास लूट सुरू असून मीटर बसवू न देणार्या ग्राहकांना अवाच्या सव्वा सरासरी बिले पाठवून आणि परमनंट डिस्कनेक्टची भीती दाखवून जबरदस्ती केली जात आहे, असा गंभीर आरोप जि. प. सदस्य आणि वेंगुर्ला तालुका वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय गावडे यांनी केला आहे. या प्रश्नावर न्याय मिळेपर्यंत महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून तिथून हलणार नाही, असा इशारा संजय गावडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.